Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: वाढत्या उन्हात ताडोबातील वन्यजीवांसाठी खास तयारी; 617 पाणवठ्यांमुळे प्राण्यांना मिळणार दिलासा

सोलार बोरवेलच्या मदतीने पाणीपुरवठा करून वाघांसह इतर प्राण्यांना मोठा दिलासा देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. यासाठीच बफर क्षेत्रात वन्यजीवांसाठी 617 कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2026 | 01:34 PM
Chandrapur News: वाढत्या उन्हात ताडोबातील वन्यजीवांसाठी खास तयारी; 617 पाणवठ्यांमुळे प्राण्यांना मिळणार दिलासा Chandrapur News: वाढत्या उन्हात ताडोबातील वन्यजीवांसाठी खास तयारी; 617 पाणवठ्यांमुळे प्राण्यांना मिळणार दिलासा

Chandrapur News: वाढत्या उन्हात ताडोबातील वन्यजीवांसाठी खास तयारी; 617 पाणवठ्यांमुळे प्राण्यांना मिळणार दिलासा Chandrapur News: वाढत्या उन्हात ताडोबातील वन्यजीवांसाठी खास तयारी; 617 पाणवठ्यांमुळे प्राण्यांना मिळणार दिलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • ताडोबात वाघांसह वन्यजीवांसाठी पाण्याची मुबलक सोय; सोलार बोरवेलद्वारे पुरवठा
  • उन्हाळ्यात वन्यजीव तहानलेले राहणार नाहीत! ताडोबा बफरमध्ये 617 जलस्रोत तयार
  • ताडोबा-अंधारीत वन्यजीव संरक्षणासाठी मोठे पाऊल; कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यांचे जाळे तयार
चंद्रपूर: वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर विभागात वन्यजीवांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. बफर क्षेत्रातील सुमारे १४०० चौकिमी जंगल परिसरात एकूण ६१७ कृत्रिम व नैसर्गिक पाणवठे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Raigad News: 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप? 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात २९६ नैसर्गिक जलस्रोत आहेत. या नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पावसाळ्यानंतर साठलेले पाणी दीर्घकाळ टिकून राहते आणि ते आटत नाही, तोपर्यंत वन्यप्राण्यांना नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध होत राहते. मात्र, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने अनेक जलस्रोत आटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृत्रिम पाणवठ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी बफर क्षेत्रात ३२१ कृत्रिम पाणवठ्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये सोलार बोरवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, पाणी पुरवठ्यासाठी कोणत्याही वाहनाचा वापर न करता पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. याशिवाय, १४८ मानव निर्मित तलावांचीही उभारणी करण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

जैवविविधतेच्या संवर्धनाला बळ

जंगलामध्ये प्रत्येक १ ते २ चौरस मीटर क्षेत्रामागे एक पाणवठा या प्रमाणात नियोजन करण्यात आले असून, वन्यजीवांना सहजपणे पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली आहे. या उपाययोजनांमुळे हरीण, नीलगाय, रानडुक्कर तसेच वाघांसारख्या प्राण्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. वन विभागाच्या या उपक्रमामुळे वन्यजीवांचे संरक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होत असून जैवविविधतेच्या संवर्धनाला देखील बळ मिळत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जलस्त्रोत कमी होत आहे. मात्र विनविभाग आणि वन्यजीव विभागाने यंदा प्राण्यांसाठी पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला आहे.

परिक्षेत्र निहाय कृत्रिम पाणवठे

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) विभागामध्ये अनेक कृत्रिम पानवठे वन्यजीवांसाठी तयार करण्यात आले असून यात चंद्रपूर परिक्षेञात ६०, खडसंगी येथे २१, मोहुर्ली येथे ३५, मूल येथे ३३, पळसगाव येथे १६, शिवनी येथे १५६ याप्रमाणे एकूण ३२१ पाठवठ्यांचा समावेश आहे.

व्यावसायिक सिलिंडरची चिंता आता मिटणार; गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होणार

विविध भागांतील मानवनिर्मित तलाव आणि नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या एका अहवालात सादर करण्यात आली आहे. मानवनिर्मित तलावांची संख्या १४६ इतकी नोंदवण्यात आली आहे. चंद्रपूर येथे ३३, खडसांगी येथे १२, मोहर्ली येथे २८, मुल येथे १५, पाचगाव येथे १७ आणि शिवनी येथे ३३ तलाव आहेत. तर नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या २९६ इतकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूरमध्ये ७६, खडसंगीमध्ये ३१, मोहरलीमध्ये ५१, मुलमध्ये २९, पळसगावमध्ये ४४ आणि शिवनीमध्ये ६५ नैसर्गिक पाणवठे आहेत. या आकडेवारीवरून संबंधित परिसरात नैसर्गिक जलस्रोतांची संख्या मानवनिर्मित तलावांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Tadoba andhari tiger reserve prepares 617 water sources for wildlife in buffer zone ahead of summer chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • tiger

संबंधित बातम्या

कोणताही गाजावाजा न करता…, प्रभासच्या साधेपणाने पुन्हा जिंकलं प्रेक्षकांचं मनं, खऱ्या आयुष्यातही ठरला हिरो
1

कोणताही गाजावाजा न करता…, प्रभासच्या साधेपणाने पुन्हा जिंकलं प्रेक्षकांचं मनं, खऱ्या आयुष्यातही ठरला हिरो

एकच झुंबड… लोकांनी नाही ऐकला PM Modi यांचा सल्ला; Gold खरेदीसाठी गर्दी? अवघ्या दोनच दिवसांत रिकामी झाले शोरूम्स?
2

एकच झुंबड… लोकांनी नाही ऐकला PM Modi यांचा सल्ला; Gold खरेदीसाठी गर्दी? अवघ्या दोनच दिवसांत रिकामी झाले शोरूम्स?

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप
3

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप

तंत्रज्ञान क्षेत्रात HP चा धमाका! भारतात 20 हून अधिक नवीन AI उत्पादने लाँच
4

तंत्रज्ञान क्षेत्रात HP चा धमाका! भारतात 20 हून अधिक नवीन AI उत्पादने लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.