Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजकीय वातावरण तापवले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2026 | 03:11 PM
Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

Follow Us
Follow Us:
  • भाजपचे अरुण लाखानी आणि महाविकास आघाडीचे शैलेश अग्रवाल यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
  • दोन्ही आघाड्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीतील चुरशीचे संकेत दिले.
  • १८ जून रोजी मतदान होणार असून ९७७ स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
चंद्रपूर: महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) प्राधिकारी मतदारसंघाच्या २०२६ च्या निवडणुकीची रंगत आता चांगलीच वाढू लागली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान भारतीय जनता पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आगामी निवडणुकीच्या चुरशीचे संकेत दिले. दोन्ही पक्षांच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले होते.

St Bus News: महाबळेश्वर एसटीचा ‘राम भरोसे’ प्रवास अखेर संपला! १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

भाजप महायुतीचे उमेदवार अरुण लाखानी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसुमना पंत यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही उमेदवारांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलींमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकत्यांनी सहभाग घेतला. (फोटो सौजन्य – AI Created) 

महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शनात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते एकत्र दिसून आले. खा. प्रतिभा धानोरकर, आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष ढोटे, शिवसेना (उबाठा) नेते संदीप गिडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शविली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना शैलेश अग्रवाल यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने निवडणूक लढत असल्याचा दावा केला.

गुरुवारी मागे घेता येणार अर्ज

सोमवारी फक्त ३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. भाजप व काँग्रेसनंतर हिंगणघाटचे सुधीर कोठारी यांनीही मैदानात उडी घेतली. कोठारी यांच्या उमेदवारीमुळे भाजप व काँग्रेसची झोप उडाली आहे. कोठारी यांनी उमेदवारी मागे घेतली, तर ही निवडणूक ‘काटे की टक्कर’ ठरणार असून थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

St Bus News: महाबळेश्वर एसटीचा ‘राम भरोसे’ प्रवास अखेर संपला! १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

१८ जूनला मतदान

येत्या १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ४० स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ९७७ सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक ४६९ मतदार चंद्रपूर जिल्ह्यात असून गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी २४४ मतदार आहेत. या मतदारांच्या निर्णयावर विधान परिषदेच्या या प्रतिष्ठेच्या जागेचे भवितव्य ठरणार आहे.

Web Title: Wardha chandrapur gadchiroli mlc poll heats up as bjp mva flex political strength

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले
1

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले

Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; ८२७ पैकी ७३४ मतांसह वर्चस्व स्पष्ट
2

Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; ८२७ पैकी ७३४ मतांसह वर्चस्व स्पष्ट

Life Insurance Guide: केवळ गरजेचा नाही तर आर्थिक सुरक्षाकवच! वय आणि गरजेनुसार कसा असावा तुमचा जीवन विमा? पाहा सविस्तर
3

Life Insurance Guide: केवळ गरजेचा नाही तर आर्थिक सुरक्षाकवच! वय आणि गरजेनुसार कसा असावा तुमचा जीवन विमा? पाहा सविस्तर

Mumbai Real Estate: मुंबईत घरांची रेकॉर्डब्रेक खरेदी! मे महिन्यात 14 वर्षांतील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी
4

Mumbai Real Estate: मुंबईत घरांची रेकॉर्डब्रेक खरेदी! मे महिन्यात 14 वर्षांतील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.