Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; ८२७ पैकी ७३४ मतांसह वर्चस्व स्पष्ट

Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. एकूण ८२७ मतदारापैकी तब्बल ७३४ मते, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला मिळाल्याने महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 04:44 PM
Pune Poitical News

Pune Poitical News

Follow Us
Follow Us:
  • पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे पारडे जड
  • ८२७ पैकी ७३४ मतांसह वर्चस्व स्पष्ट
  • राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Pune Political News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षीय बलाबलाच्या गणितात महायुतीचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. एकूण ८२७ मतदारांपैकी तब्बल ७३४ मते भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या ताब्यात असल्याने महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापेक्षा महायुतीला किती मताधिक्य मिळणार, याचीच राजकीय वर्तुळात अधिक चर्चा रंगू लागली आहे.

Nashik MLC Election : नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने रंगले समीकरण

मतदारसंघातील एकूण मतदारांमध्ये ग्रामीण भागातील ५७० मतदारांचा (स्वीकृत सदस्यांसह) समावेश असून पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांतील मतदारांची संख्या ३०६ इतकी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांचे प्रमाण शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याने त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रावादी कॉंग्रेसकडे सर्वाधिक मते

पक्षनिहाय मतदारसंख्येचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक ३४४ मते आहेत. त्यापैकी केवळ ६४ मते पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील असून तब्बल २८० मते ग्रामीण भागातील आहेत. भाजपकडे एकूण ३०५ मते असून त्यातील २०३ मते शहरी भागातील, तर १०२ मते ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय शिवसेना (शिंदे गट) ६८, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १७, काँग्रेस १९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ११, अपक्ष २३ आणि इतर आघाडी समर्थक २३ मतदार आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना या निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात भाजपची वाढती ताकद लक्षात घेता या जागेवर भाजपकडूनही दावा करण्यात आला होता. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने समन्वय साधत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपविल्याने संभाव्य अंतर्गत संघर्ष आणि बंडखोरी टळल्याचे मानले जात आहे.

इतिहासाचा आढावा घेतला असता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते आणि पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ नेते प्रा. रामकृष्ण मोरे विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर २००३ मधील पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यानंतर २००४, २००९ (पोटनिवडणूक), २०१० आणि २०१६ या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देताना ग्रामीण भागातील नेतृत्वाला संधी न दिल्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. ग्रामीण भागातील मतदारसंख्या निर्णायक असतानाही नेतृत्वाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा या निवडणुकीतही चर्चेचा विषय ठरत आहे.

मतदारांची संख्या पक्षनिहाय

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ३४४
  • भारतीय जनता पार्टी – ३०५
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – १७
  • शिवसेना शिंदे गट – ६८
  • शिवसेना उबाठा – ११
  • काँग्रेस – १९
  • अपक्ष – २३
  • आघाडी – २३
Satara Politics : शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत; अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला

Web Title: Pune local body election mahayuti dominates with 734 votes out of 827

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले
1

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले

विषारी दारू कांडामुळे पोलिस आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानातील समन्वयाचा अभाव उघड
2

विषारी दारू कांडामुळे पोलिस आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानातील समन्वयाचा अभाव उघड

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत
3

Chandrapur News: चंद्रपुरात राजकीय शक्तिप्रदर्शन; विधान परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न
4

आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.