Lok Sabha 2024 Candidate Chhagan Bhujbal : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षाने कंबर कसली असताना, अजूनही महायुतीमधील काही जागांचा तिढा कायम आहे. यामध्ये नाशिकच्या जागेचासुद्धा उल्लेख करता येईल. आता यात नवीन पर्व सुरू झालेय असे वाटतेय, कारण छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. भुजबळांकडून लोकसभेची चाचपणी केली जात आहे.
नाशिक लोकसभेचा तिढा कायम
लोकसभा निवडणुकीसाठीचं महायुतीचं जागावाटप अद्याप झालेलं नाही. भाजपने जरी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले असले तरी काही जागांवरचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच महायुतीच्या जागा वाटपात नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आणि शिंदे गटाच्या वादात नशिकच्या जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे. छगन भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
नाशिकच्या जागेवरून तिढा कायम
सध्या शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे हे नाशिकचे खासदार आहेत. पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून ते आग्रही आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांआधी बोलताना हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. त्यांनंतर महायुतीतील विशेषत: भाजपचे नेते, कायकर्ते नाराज झाले होते. भाजपचे नेते, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय आता छगन भुजबळदेखील निवडणूक लढण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती आहे