फोटो सौजन्य सोशल मिडिया
अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत जाफर गेट, जुना मोंढा येथील मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या युनिटची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका एल, झाडे यांनी सहकाऱ्यांसह ही कारवाई केली. तपासणीत स्वच्छता, खाद्यतेलाची साठवणूक, कामगारांची सुरक्षितता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अनेक त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
कारवाईत रिफाइंड सोयाबीन आणि पामोलीन तेलाचा एकूण १२ हजार ३८२ किलो साठा जप्त करण्यात आला. यामध्ये ‘केशर गोल्ड’ ब्रेडच्या डबे-कॅनमधील ४०७,९ किलो सोयाबीन तेलाची किंमत ८५ हजार ९७० रुपये, टैंक क्रमांक सहामधील ७,९८८.४ किलो सुट्या सोयाबीन तेलाची किंमत १४ लाख ८५ हजार ८४२ १८४२ रुपये, तर टैंक क्रमांक
दोनमधील २,९८८.४ किलो तेलाची किंमत ५ लाख ५५ हजार ८४२ रुपये आहे. याशिवाय ७९ किलो पामोलीन तेलाची किंमत १७ हजार ६०० रुपये आहे. हा संपूर्ण साठा संशयास्पद, अपमिश्रित आणि चुकीचे बंडिंग केलेला असल्याच्या कारणावरून जप्त करण्यात आल्याचे प्रशासनाने माटले आहे.
तपासणीदरम्यान इमारतीच्या छतावर कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ स्वच्छतागृह, तेलगळतीमुळे घसरडी झालेली फरशी आणि अन्नपदार्थ व पॅकेजिंग साहित्याची अयोग्य साठवणूक आढळली, खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्या नव्हत्या, तर उंदरांना पकडण्यासाठी ट्रॅप्सही बसवलेले नव्हते. कामगारांची वैद्यकीय तपासणी झाल्याची नोंद नन्हती. तसेच कामगारांकडे कैंप, अप्रन आणि हातमोजे यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने नसल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले.
Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव






