Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा; उष्माघात सदृश्य १२ रुग्ण दाखल, आरोग्य विभाग सतर्क

जिल्ह्यात उष्माघात सदृश्य १२ रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. खबरदारी म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 30, 2026 | 06:17 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा
  • उष्माघात सदृश्य १२ रुग्ण दाखल
  • आरोग्य विभाग सतर्क
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्वत्र सूर्य आग ओकत असून, संभाजीनगर जिल्ह्यातही तीव्र उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत. जिल्ह्यात उष्माघात सदृश्य १२ रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. खबरदारी म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दरम्यान, पुढील तापमानातील अपेक्षित वाढ पाहता उष्माघाताबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून ग्रामीण भागात तिचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे. दुपारच्या वेळेत नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. आवश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळले जात आहे. संपूर्ण एप्रिल महिना उष्णतेचा गेला. विक्रमी ४३ अंशाच्याही वर कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मात्र उष्माघाताचा एकही रुग्ण जिल्ह्यात
आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. सध्या दिवसा तसेच रात्रीचे तापमानही लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामुळे नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी उष्माघातासदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, २७ व २८ एप्रिल या दोन दिवसात जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सुमारे १२ रुग्ण उष्माघातासदृश्य लक्षणांमुळे शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःचे व कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे. चक्कर येणे, मळमळ, जास्त घाम येणे किंवा घाम बंद होणे, अशी उष्माघाताची लक्षणे असून, अशी लक्षणे दिसल्यास आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नु, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले.

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांच्या पार; ‘डिहायड्रेशन’ आणि डोकेदुखीच्या रुग्णांत मोठी वाढ

जिल्ह्यातील उष्माघात सदृश्य रुग्णांची स्थिती

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विविध शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये दाखल झालेल्या १२ रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

अ. क्र. तालुका रुग्णसंख्या
१ फुलंब्री ३
२ पैठण २
३ वैजापूर २
४ सिल्लोड २
५ खुलताबाद १
६ गंगापूर १
७ छ. संभाजीनगर १
एकूण १२

तहान नसेल तरी पाणी प्या

वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने उष्माघातापासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर जाणे टाळावे. पुरेसे पाणी व द्रवपदार्थाचे सेवन करावे. हलका व पचायला सोपा आहार घ्यावा. तहान नसेल तरीही ठराविक वेळेत पाणी पीत रहावे. शरीरातील पाणीपातळी संतुलित ठेवावी. डोक्यावर टोपी, ओढणी, छत्रीचा वापर करावा. लहान मुले, वृद्ध व गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.

संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! आता भर दुपारी वीज गायब होणार नाही; महावितरणने बदलली कामाची वेळ

Web Title: Chhatrapati sambhajinagar heatwave update heatstroke patients precautionary measures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • heat wave

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.