संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! (Photo Credit- AI)
उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगाने सुरू आहेत. टप्याटप्याने ही कामे होत असल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित केला जात होता. भर उन्हात वीज खंडित करू नका अशी नागरिकांकडून ओरड सुरू होती. अखेरीस, उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावीत, अशा सूचना मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी टाळण्यार वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे राज्यभरात सध्या सुरू आहेत. व छत्रपती संभाजीनगर शहर परिमंडळातदेखील नागरिकांकडून कामांची वेळ बदल्याची मागणी होत होती.
साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू होती. याबाबत
नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. भर दुपारी वीजपुरवठा बंद केल्याने उकाड्यात राहावे लागत असल्याने शहरवासियांकडून याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. वीजवाहिनीच्या दुरुस्तीची कामे यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे ठरवले आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याच्या एक दिवस आधी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याच्या सूचनाही मुख्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.






