267 Mobile Phones Recovered
पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या संकल्पनेतून आणि पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या . मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. हरविलेल्या मोबाईलचा शोध घेताना पोलिसांना राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, केरळ आणि तमिळनाडू या आठ राज्यांपर्यंत पोहोचावे लागले.
संबंधित राज्यांतील स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून हे मोबाइल हस्तगत करण्यात आले. मोबाईल हरविल्याची किवा चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचे पथक मोबाईलचा १५ अंकी आयएमईआय क्रमांक सीईआयआर पोर्टलवर नोंदविते. त्यानंतर संबंधित मोबाइल ब्लॉक केला जातो. त्यात दुसरे सिमकार्ड टाकून मोबाइल सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास नवीन क्रमांक आणि तांत्रिक माहिती पोर्टलवर उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे पोलिस मोबाईल वापरणाऱ्यांचा माग काढतात. याच तांत्रिक यंत्रणेचा वापर करून पोलिसांनी आठ राज्यांतून मोबाइल हस्तगत केले.
या मोहिमेत मोबाइलसोबत सोन्याचे मंगळसूत्र, मनी मंगळसूत्र, नेकलेस आणि बांगड्यांचाही समावेश होता. कष्टाच्या कमाईतून घेतलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, कामगार आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी हरविलेल्या वस्तू पुन्हा मिळण्याची आशाच सोडली होती.
Ans: तब्बल २६७ हरविलेले मोबाइल शोधून काढले.
Ans: CEIR पोर्टलचा वापर केला.
Ans: राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, केरळ आणि तमिळनाडू अशा आठ राज्यांतून मोबाइल हस्तगत केले.






