Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaijapur Solar Bill Issue: सौरऊर्जा की ‘शॉक’ ऊर्जा? वैजापूरमध्ये निवृत्त अधिकाऱ्याला 1 लाखाचे वीजबिल; नेमका गोंधळ काय?

महावितरणच्या 13 फेब्रुवारीच्या नवीन नियमांमुळे सौरऊर्जा ग्राहकांमध्ये संताप. वैजापूरमध्ये अतिरिक्त वीज निर्मितीसाठी लाखांचा दंड. पीएम सूर्यघर योजनेच्या उद्दिष्टांना खीळ.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 03:19 PM
वैजापूरमध्ये निवृत्त अधिकाऱ्याला 1 लाखाचे वीजबिल (Photo Credit- AI)

वैजापूरमध्ये निवृत्त अधिकाऱ्याला 1 लाखाचे वीजबिल (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • सौरऊर्जा की ‘शॉक’ ऊर्जा?
  • वैजापूरमध्ये निवृत्त अधिकाऱ्याला 1 लाखाचे वीजबिल
  • नेमका गोंधळ काय?
एकीकडे केंद्र सरकार ‘पीएम सूर्यघर’ योजनेद्वारे देशाला हरित ऊर्जेत स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट ठेवत असताना, दुसरीकडे महावितरणच्या नव्या नियमांमुळे सौरऊर्जा ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. 13 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेल्या निर्णयांमुळे सौरऊर्जा क्षेत्रासाठीच हे धोरण ‘डेथ वॉरंट’ ठरत असल्याची टीका ग्राहकांकडून केली जात आहे.

शहरातील मुस्तफा पार्क परिसरातील रहिवासी तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त अधिकारी सलीम मुहम्मद पटेल पावना प्रकरणामुळे हा वाद अधिकच चर्चेत आला आहे. सौर यंत्रणा बसवण्यापूर्वी दरमहा दोन ते अडीच हजार रुपये येणारे वीज बिल, सौर संच बसवल्यानंतर चक्क एक लाख रुपयांपर्यंत आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सलीम पटेल यांनी दंड रद्द करून वीज बिल दुरुस्त करावे तसेच सौरऊर्जा निर्मितीबाबत स्पष्ट कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे आवश्यकतेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्याचा ठपका ठेवत महावितरणकडून अन्यायकारक पद्धतीने दंड आकारण्यात आल्याचा आरोप संबंधित ग्राहकाने केला आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या वैजापूर उपविभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली असून आपण नियमित वीज ग्राहक असून कोणतीही थकबाकी किंवा नियमभंग केलेला नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार, अतिरिक्त वीज निर्मितीबाबत कोणतीही पूर्वसूचना, तांत्रिक मार्गदर्शन किंवा स्पष्ट नियमांची माहिती देण्यात आली नसताना थेट दंड आकारण्यात आला.

Mahavitaran News: महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका! थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता घरात बसून होणार खंडित

नेमका गोंधळ काय?

महावितरणने 13 फेब्रुवारीपासून नवीन अटी लागू केल्याचे सांगितले जात आहे. जुन्या ग्राहकांनी मंजूर क्षमतेपेक्षा अधिक वीजनिर्मिती केल्यास दंड आकारला जात आहे, तर नवीन ग्राहकांना त्यांच्या सरासरी वीज वापरापेक्षा जास्त क्षमतेचे सौर युनिट बसवण्यास परवानगी नाकारली जात असल्याची तक्रार आहे.

‘धोरण की सावकारी?’

केंद्र सरकारकडून सौरऊर्जेसाठी कोट्यवधींच्या सबसिडीची घोषणा करण्यात आली असताना, जास्त वीज निर्मितीबद्दल प्रोत्साहन देण्याऐवजी दंड आकारला जात असल्याने सौरऊर्जा धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयांमुळे सौर पॅनल बसवणाऱ्या हजारो उद्योजकांचीही अडचण झाली आहे.

जाचक अटींमुळे ग्राहक रडारवर

वीज बचतीसाठी लाखो रुपये खर्चुन सौर संच बसवलेल्या ग्राहकांना आता 60 हजार ते लाख रुपये पर्यंत वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सौर संच बसवल्यानंतर बिल शून्य किंवा अत्यल्प येण्याची अपेक्षा असताना उलट मोठी बिले येत असल्याने अनेक ग्राहक पश्चाताप व्यक्त करत आहेत. वैजापूर शहरातील अनेक ग्राहकांना 40 ते 60 हजार रुपयांची बिले मिळाल्याचा दावा करण्यात येत असून प्रति युनिट 40 ते 60 रुपये दर कोणत्या कायद्यानुसार आकारला जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले; पाहा काय आहे नेमके कारण?

Web Title: Retired officer in vaijapur faces electricity bill of rs 1 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • mahavitaran
  • Vaijapur

संबंधित बातम्या

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
1

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
2

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.