Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

जालना उपविभागातील शेतकऱ्यांकडून २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागवण्यात आले आहेत. आता पुढील टप्प्यात ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 18, 2025 | 04:51 PM
महिलांसह ज्येष्ठांना रेल्वेकडून मोठी भेट; तिकीट बुकिंग करताच आपोआपच मिळणार 'लोअर बर्थ'

महिलांसह ज्येष्ठांना रेल्वेकडून मोठी भेट; तिकीट बुकिंग करताच आपोआपच मिळणार 'लोअर बर्थ'

Follow Us
Follow Us:
  • जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार मोठी चालना
  • जमिनीचे संपादन प्रक्रिया सुरू
  • २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या
छत्रपती संभाजीनगर: केंद्र सरकारने (Central Goverment) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. यामुळे मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. रेल्वे गेमचेंजर प्लॅन असलेल्या व १७७,७९ किमी लांबीच्या या मार्गासाठी ऑगस्टमध्ये केंद्राकडून निधी उपलब्ध करण्यात आला होता. त्यानंतर जमीन संपादनासाठी प्राथमिक अधिसूचना जारी झाली.

 

जालना उपविभागातील शेतकऱ्यांकडून २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागवण्यात आले आहेत. आता पुढील टप्प्यात ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या दुहेरीकरण प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-नांदेड रेल्वे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामांना चालना मिळेल. लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकल्प प्राधान्य यादीत आला आणि आता प्रत्यक्ष कामाला गती मिळू लागली आहे.

रेल्वे रुळाच्या लगत असणाऱ्या जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यावर आधारित अंतिम अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर जमिनीचे दर निश्चित होऊन बाधितांना मोबदला मिळेल, रेल्वे रुळालगतची मोजणी असल्याने प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी दिली.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अनेक गावातील जमीन संपदित होणार

जालना तालुका अंदाजे २०. २६ हेक्टर जमीन दरेगाव, हिस्वन बु., कारला, लोंड्याची वाडी, माळीपिंपळगाव, ममदाबाद, पाचनवडगाव, रोहनवाडी, बदनापूर, दावलवाडी, मात्रेवाडी, रामखेडा, शेलगाव, वरुडी, गोकुळवाडी

परतूर उपविभाग अंदाजे ७ हेक्टर जमीनआनंदवाडी, परतूर, खांडवी, उस्मानपूर, रायपूर, सातोना खु… सिरसगाव, मसला या गावांतील जमिनी मार्गदुहेरीकरणासाठी संपादित केल्या जाणार असून, बाधितांना ठरावीक दराने मोबदला मिळणार आहे.

या कामामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रवास अधिक जलद होणार आहे. शेतमाल आणि औद्योगिक माल वाहतुकीला गती मिळणार असून उद्योगांसाठीही हा प्रकल्प सुवर्णसंधी राहणार आहे. लॉजिस्टिक पार्क, कोल्ड स्टोरेज, गोदामे, नवे उद्योग येण्यास चालना मिळणार आहे.

मराठवाड्‌यासाठी विकासाचा नवा महामार्ग

या प्रकल्पामुळे केवळ रेल्वे वाहतुकीचाच नाही, तर संपूर्ण मराठवाड्याच्या औद्योगिक, कृषी आणि बाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. २१७९ कोटींच्या या दुहेरीकरणामुळे मराठवाड्‌याचा विकास अनेक पटीने वेगाने होण्याची अपेक्षा आहे.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Weather: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा

Web Title: Rs 2179 crore approved for doubling of chhatrapati sambhajinagar parbhani railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Central Governement
  • Chhatrapati Sambhajinagar
  • railway

संबंधित बातम्या

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 14 लाख रुपये; पाहा पगाराचं संपूर्ण कॅलक्युलेशन
1

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 14 लाख रुपये; पाहा पगाराचं संपूर्ण कॅलक्युलेशन

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
3

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
4

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.