Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MIM vs Shiv Sena: छत्रपती संभाजीनगर पालिकेत ‘रिल्स वॉर’! शिवसेना-एमआयएम वाद विकोपाला; एकमेकांचे कपडे फाडण्याची भाषा

MIM vs Shiv Sena Reel War: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना आणि एमआयएममध्ये रिल्सवरून 'वॉर' सुरू झाले आहे. उपमहापौर जंजाळांच्या सल्ल्याला एमआयएमने दंगलीच्या आरोपावरून प्रत्युत्तर दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 06, 2026 | 01:16 PM
छत्रपती संभाजीनगर पालिकेत 'रिल्स वॉर'! शिवसेना-एमआयएम वाद विकोपाला (Photo Credit- Ai)

छत्रपती संभाजीनगर पालिकेत 'रिल्स वॉर'! शिवसेना-एमआयएम वाद विकोपाला (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर पालिकेत ‘रिल्स वॉर’!
  • शिवसेना-एमआयएम वाद विकोपाला
  • एकमेकांचे कपडे फाडण्याची भाषा
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): सभागृहात विकासाच्या मुद्यांऐवजी रिल्स काढून समाजमाध्यमांवर शेअर करण्याचे काम अनेक नगरसेवक करीत असून त्यात एमआयएम आणि शिंदे सेनेचे नगरसेवक आघाडीवर आहेत. हाच मुद्दा आता वादाची ठिणगी बनून सभागृहाबाहेरही पेटवला जात आहे. रिल्सच्या माध्यमातून एकमेकांचे कपडे फाडण्याचे काम केले जात असल्याने पालिका सभागृह ‘रिल्स वॉर’ सेंटर बनत चालले आहे. याच मुद्यांवरुन उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सल्ला दिला की, त्यांनी रीलस्टार नव्हे तर रिअल स्टार व्हावे’. तर दुसरीकडे, ज्यांच्यावर दंगल घडवण्याचे आरोप आहेत त्यांनी आम्हाला चांगले काय, वाईट काय हे शिकवण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर एमआयएमने दिले आहे. दरम्यान, महापालिकेच्या सभागृहात आता शिवसेना एमआयएम वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या महापालिकेत सदस्यांचा आवाज घुमू लागला आहे. निवडणूकअंती महापालिका सभागृहात सर्वाधिक ५८ सदस्य भाजपचे पोहोचले. भाजप (५८) आणि शिवसेना (१२) यांनी एकत्र येत पालिकेवर सत्ता स्थापन केली. तर भाजप पाठोपाठ सर्वाधिक ३३ सदस्यांसह एमआयएम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. दरम्यान, शिवसेना आणि एमआयएममध्ये पूर्वीपासून सुरु असलेली घुमश्चक्री वेळोवेळी पालिकेतही पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद! अवघ्या ३ दिवसांत १० हजारांवर नोंदणी; ३,८०० कर्मचारी मैदानात

सत्ता काबीज करण्यासाठी एमआयएमने पूर्ण प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना अपयश आले. अखेरीस विरोधी बाकावर बसून ते आता सत्ताधाऱ्यांवर नजर ठेवत आहेत. एमआयएमला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना भाजप सोडत नाही. एमआयएम नगरसेवकांना औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर म्हटल्याशिवाय निधी मिळणार नसल्याचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी स्पष्ट केलेले आहे. शहागंज चौकात ठेले लावण्यावरून शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल आणि एमआयएम मधील वादही चांगलाच गाजला.

रिल्स समाजसेवेच्या….

जंजाळ यांच्या टीकेच्या प्रत्युत्तरात एमआयएम नगरसेवक ओसामा कादिर मौलाना यांनी जंजाळावर प्रतीवार केला. आम्ही विकासाच्या रिल्स बनवतो. त्या व्हायरल करतो. जे आरोप करत आहेत त्यांचे एकदा इतिहास पाहावा. त्यांच्यावर कोणकोणते आरोप झाले, ते कोणत्या आरोपामध्ये जेलमध्ये गेले हेही त्यांनी पहावे. तुमच्यावर दंगलीचे आरोप आहेत. काहीही बोलण्याआधी आपल्या पदाची, सभागृहाची गरिमा ठेवावी. तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही जनतेची कामे करत आहोत. आमच्यावर लोकांच्या कामांसाठी केसेस दाखल झाल्या आहेत. आम्ही दंगली घडवल्या नाहीत. हिंदू मुस्लिम वाद होतात तेव्हा हेच सर्वात पुढे असतात. जीभ आमच्याकडेही आहे आम्हीच बोलू शकतो असा इशाराही एमआयएम नगरसेवकाने दिला.

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा! जिल्हाधिकारी यांचे यंत्रणेला कडक निर्देश; जलयुक्त शिवार २.० चा आढावा

Web Title: Sambhajinagar municipal corporation shivsena vs mim reels war controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • AIMIM
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
1

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
2

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
3

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
4

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.