महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. नागरिकांना मोबाईल अॅप आणि ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
१ मे रोजी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २,९८५ नागरिकांनी स्वयं-नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यापैकी २,१८२ जणांनी नोंदणी पूर्ण केली, तर उर्वरित प्रक्रिया सुरू होती. पुढील दोन दिवसांत सहभागात मोठी वाढ होऊन एकूण आकडा १०,०७९ वर पोहोचला. यामध्ये अद्याप २,४६८ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वयं-नोंदणीचा पहिला टप्पा १५ मेपर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतर १६ मेपासून पुढील टप्प्याला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात नियुक्त कर्मचारी घराघरांत भेट देऊन नागरिकांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करतील. त्याचबरोबर प्रत्येक घराला स्वतंत्र क्रमांक देण्याचे कामही केले जाणार आहे.
मोहिमेची अंमलबजावणी सुलभकरण्यासाठी शहराचे १० स्वतंत्र ब्लॉकमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये साधारण १२० ते १४० घरांचा समावेश असेल. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला निश्चित क्षेत्र मिळून कामाची गती आणि अचूकता दोन्ही साध्य होणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला महत्व आले आहे.
जनगणना प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी स्वयं-नोंदणी करताना अचूक माहिती भरावी, तसेच पडताळणीच्या वेळी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग हा या मोहिमेच्या यशाचा प्रमुख घटक ठरणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जनगणना मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची तयारी करण्यात आली आहे. समारे ३५०० सुमारे ३,५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन १० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ३,७०० ते ३,८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. फौजेत रिसता कहापालिका कर्मचारी आणि विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.






