Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप, मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाने मनपा आयुक्त आणि मजीप्राच्या मुख्य अभियंत्यांना २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 21, 2026 | 02:30 PM
पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप (Photo Credit- X)

पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी
  • हायकोर्टाचा संताप
  • मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा योजनेच्या कामातील त्रुटींबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे मुंबई उच्च न्यायालय कडक भूमिकेत दिसले. अर्धवट कामाच्या छायाचित्रांसह सादर केलेल्या पुराव्यांनंतर न्यायालयाने मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (मजीप्रा) जबाबदारीची जाणीव करून दिली. पाणीपुरवठा योजनेत अनेक त्रुटींमुळे काम पूर्णत्वास न पोहोचता पाणीपुरवठा सुरू करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. पुढील सुनावणीसाठी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुनावणीदरम्यान मनपा आयुक्त जी. श्रीकांत ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढळलेल्या उणिवांची माहिती न्यायालयाला दिली. यानंतर न्यायालयाने आयुक्त तसेच मजीप्राच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांना २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायालयाने स्पष्ट केले की, ही योजना २०५० सालातील लोकसंख्येचा विचार करून तयार करण्यात आलेली आहे. काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करणे धोकादायक ठरू शकते. सुनावणीवेळी कंत्राटदार कंपनीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर.एम. धोर्डे, अॅड. राजेंद्र देशमुख, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, अॅड. विनोद पाटील, मनपाच्या वतीने अॅड. संभाजी टोपे, मूळ याचिकाकर्ते अमित मुखेडकर आदी सुनावणीवेळी हजर होते.

पाणीपुरवठ्याच्या कामातील या आहेत त्रुटी

उद्भव विहिरीची (जॅकवेल) स्वच्छता अपूर्ण असून मोठ्या २५०० मिमी जलवाहिनीत अनेक ठिकाणी पॅकिंग खराब झाले आहे. सुमारे ८७ जोडांपैकी अनेक ठिकाणी गळतीची शक्यता निर्माण झाली आहे. स्वच्छतेअभावी संपूर्ण यंत्रणा कार्यक्षमतेने सुरू होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी या कामासाठी १०० ते १५० कर्मचारी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असून अग्निशमन दलाच्या मदतीने स्वच्छता मोहीमही सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

Maharashtra Politics: सरकारच्या अडचणी वाढणार? Muslim Reservation रद्दच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

कंत्राटदाराचा दावा

कंत्राटदाराच्या बाजूने सादर केलेल्या माहितीनुसार सुमारे ८० टक्के स्वच्छतेचे काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम लवकरच पूर्ण केले जाईल. मात्र, प्रत्यक्ष स्थिती आणि अहवालातील निरीक्षणे यात तफावत असल्याचे निदर्शनास आले.

पर्यायी पाणीपुरवठा

शहरातील विद्यमान २६ जुने जलकुंभआणि नव्या जलकुंभांच्या माध्यमातून सुमारे दोन तृतीयांश भागाला पाणीपुरवठा करता येऊ शकतो. यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी देण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले.

दरमहा सुमारे ४ कोटी रुपयांचा होतोय खर्च

योजनेसाठी आवश्यक वीज जोडणीचा मुद्दाही सुनावणीदरम्यान चर्चिला गेला, मनपा आयुक्तांनी सांगितले की, तत्काळ वीज करार केल्यास दरमहा सुमारे ४ कोटी रुपयांचा खर्च सुरू होईल. योजनेतील प्रत्येक जलपंपाची किमत सुमारे ७ कोटी रुपये असून एकूण दहा पंप आहेत, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाचे निर्देश

अर्धवट कामांमुळे तातडीने पाणीपुरवठा सुरू केल्यास कोणते धोके संभवतात, याची सविस्तर यादी तयार करून पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व त्रुटी दूर करूनव योजना कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला.

Mumbai High Court: महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ

Web Title: Serious error in water supply scheme work high court angered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Mumbai High Court
  • water issues

संबंधित बातम्या

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे; सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध
1

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे; सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल
2

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल

संभाजीनगर महापालिका मालामाल! प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ; वर्षभरात ४.८५ कोटींची कमाई
3

संभाजीनगर महापालिका मालामाल! प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ; वर्षभरात ४.८५ कोटींची कमाई

Sambhajinagar Water Supply: मुख्य जलवाहिनीच्या चाचणीला ‘विघ्न’; रात्रभर पाणी उपसा करून व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी प्रशासनाची धडपड
4

Sambhajinagar Water Supply: मुख्य जलवाहिनीच्या चाचणीला ‘विघ्न’; रात्रभर पाणी उपसा करून व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी प्रशासनाची धडपड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.