Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! दर १५ दिवसांनी राबवली जाणार स्वच्छता मोहीम; प्रवाशांना मिळणार हायटेक सुविधा

छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बसस्थानके स्वच्छ करण्यासाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या आरोग्यावर महामंडळाचा भर असेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 07, 2026 | 03:05 PM
'लालपरी'तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

'लालपरी'तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

Follow Us
Follow Us:

 

  • एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार!
  • दर १५ दिवसांनी राबवली जाणार स्वच्छता मोहीम
  • प्रवाशांना मिळणार हायटेक सुविधा
ST Bus Stand Cleanliness News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व बसस्थानके आणि प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर १५ दिवसांनी ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम’ राबवली जाणार आहे. एसटीची जनमानसातील प्रतिमा सुधारणे आणि प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सेवा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

काय आहे ‘स्वच्छता ॲक्शन प्लॅन’?

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या मंथनानुसार, बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खालील पावले उचलली जाती. बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काचा आणि विशेषतः शौचालयांची सखोल स्वच्छता केली जाईल. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे आणि जाहिरातींचे जुने फलक हटवले जातील. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी नियमित स्वच्छता आणि देखभाल ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

लोकसहभागातून अभियान यशस्वी करणार

ही मोहीम केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित न राहता, यात स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि नागरिक यांचाही सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. या मोहिमेची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपवण्यात आली असून, यामुळे प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.

स्वच्छता तर होईल, पण सुरक्षेचे काय? 

एकीकडे स्वच्छतेचा संकल्प केला जात असला तरी, छत्रपती संभाजीनगरमधील कोतवालपुरा (CBS) बसस्थानकावर प्रवाशांना इतरही गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. कचरा आणि घाणीसोबतच मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. खासगी बसचे एजंट प्रवाशांना पळवतात, तर भिकारी आणि चोरट्यांच्या टोळ्यांमुळे प्रवाशांचे पाकीट व सामान चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हजारो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केवळ २-३ पोलिस कर्मचारी अपुरे पडत आहेत. नवीन स्वच्छता योजनेत या सामाजिक समस्यांच्या निराकरणाचा समावेश नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें

Web Title: St bus stations will be transformed a cleanliness drive will be conducted every 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • bus
  • Bus Stand
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • msrtc

संबंधित बातम्या

MSRTC employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष? मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवण्याचा संघटनेचा इशारा
1

MSRTC employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष? मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवण्याचा संघटनेचा इशारा

JSW Greentech Sambhajinagar Plant : छत्रपती संभाजीनगर येथील जेएसडब्ल्यू ग्रीनटेक प्रकल्प बस आणि ट्रक उत्पादनासाठी सज्ज
2

JSW Greentech Sambhajinagar Plant : छत्रपती संभाजीनगर येथील जेएसडब्ल्यू ग्रीनटेक प्रकल्प बस आणि ट्रक उत्पादनासाठी सज्ज

Rotary Club Social Initiative : नेवपूरच्या विद्यार्थिनींना मिळाल्या पाच सायकली; रोटरी क्लबचा पुढाकार
3

Rotary Club Social Initiative : नेवपूरच्या विद्यार्थिनींना मिळाल्या पाच सायकली; रोटरी क्लबचा पुढाकार

Shahanurwadi Land Case : संभाजीनगरमध्ये 4.76 हेक्टर जमिनीच्या हस्तांतरणात बनावटगिरी, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
4

Shahanurwadi Land Case : संभाजीनगरमध्ये 4.76 हेक्टर जमिनीच्या हस्तांतरणात बनावटगिरी, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.