फक्त 'या' गावात वाजतोय 'अभ्यासाचा भोंगा'; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक (Photo Credit - AI)
नेमका काय आहे ‘अभ्यासाचा भोंगा’?
गावातील टॉवरवर एक विशेष भोंगा बसवण्यात आला आहे. हा भोंगा दररोज सायंकाळी ७ वाजता आणि सकाळी ५ वाजता वाजतो. भोंगा वाजल्यानंतर पुढील दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवले जातात. या चार तासांच्या काळात गावातील सर्व विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यास करतातपालकांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ते स्वतः पाल्यांच्या अभ्यासावर लक्ष देत आहेत.
गावाचा कायापालट: सीसीटीव्ही ते शाळा सुशोभीकरण
केवळ अभ्यासाचा भोंगाच नव्हे, तर सावखेडा बु. आणि खुर्द या ग्रुप ग्रामपंचायतीने विकासाची अनेक कामे मार्गी लावली आहेत. गावात कायमस्वरूपी स्वच्छता मोहीम आणि शाळांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. गावांतील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वनराई बंधारे बांधून पाणी पातळी वाढवण्याचे प्रयत्न झाले आहेत. महिला बचत गटांना बळ देऊन रोजगार निर्मितीवर भर दिला आहे.
प्रशासनाकडून कौतुक
सिल्लोडचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “मोबाईलमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होत आहे. सावखेडा ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम आदर्श आहे. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही असे उपक्रम राबवावेत, यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू.” या यशासाठी सरपंच काशिनाथ गोरे, उपसरपंच प्रभाकर गोंगे, ग्रामसेवक व्ही. एस. ढोंगे आणि सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी






