Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २,७४० कोटींच्या अमृत-२ पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. नक्षत्रवाडी एमबीआरमधून शहराला १० एमएलडी अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 05, 2026 | 02:45 PM
अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! 'अमृत-२' योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! 'अमृत-२' योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू

Follow Us
Follow Us:
  • अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार!
  • ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू
  • शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या अमृत-२ योजनेतील नव्या जलप्रकल्पातून अखेर प्रत्यक्ष पाणीपुरवठ्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नक्षत्रवाडी येथील मास्टर बॅलन्सिंग रिझव्हॉयरमधून (एमबीआर) गुरुवारपासून महापालिकेला १० एमएलडी पाणी देण्यात आले. त्यामुळे शहराच्या उपलब्ध पाण्यात वाढ होऊन मागणी आणि उपलब्धता यांतील तफावत कमी होण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाच्या अमृत-२ अभियानांतर्गत २ हजार ७४० कोटी रुपयांच्या खर्चातून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फतजीव्हीपीआर कंपनीकडून प्रकल्पाचे काम सुरू असून, पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर योजनेची चाचणी सुरू करण्यात आली होती. जायकवाडी धरण परिसरातील जॅकवेलमधून ३८ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यात आले. जलवाहिनी व यंत्रणांच्या यशस्वी चाचणीनंतर स्वच्छता मोहीम राबवून पाण्याची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार तपासण्यात आली. प्रयोगशाळेतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर शुद्ध केलेले पाणी एमबीआरमध्ये साठविण्यात आले.

Farmer Protest: सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक… शेतकरी संघटना आक्रमक, शासन निर्णयाची केली होळी

विभागीय आयुक्तांच्या समितीने पाहणी करून शहरासाठी या साठ्यातून पाणीपुरवठ्यास मंजुरी दिल्यानंतर गुरुवारपासून पुरवठा सुरू करण्यात आला. प्रारंभी एमबीआरमध्ये २० एमएलडी पाणी साठविण्यात आले असून त्यापैकी १० एमएलडी पाणी महापालिकेच्या वितरण व्यवस्थेत सोडण्यात आले. त्यामुळे शहराला सध्या मिळणारे पाणी १७० वरून १७५ एमएलडीपर्यंत पोहोचले आहे.

पहिला टप्पा यशस्वी

राज्यातील सर्वांत मोठ्या पाणीपुरवठा योजनांपैकी ही एक योजना मानली जाते. जायकवाडी धरणातून थेट जलउपसा, ३८ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी, अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र आणि मोठ्या क्षमतेचे साठवण प्रकल्प ही तिची वैशिष्ट्‌ये आहेत. प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाल्याने प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वी ठरला आहे.

१५ एमएलडीची वाढ

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अलीकडेच ७५ एमएलडी क्षमतेची योजना सुरू केली आहे. या योजनेतून गेल्या पंधरा दिवसांत सुमारे १५ एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. यापूर्वी २६ एमएलडी पाणी मिळत होते. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

Web Title: Water supply boost amrut 2 scheme starts 10 mld water from nakshatrawadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis
  • water scheme

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
1

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Akola water crisis : धरणातील पाणी पातळी खालावल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले!
2

Akola water crisis : धरणातील पाणी पातळी खालावल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले!

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम
3

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
4

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.