औरंगाबाद : शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात एक हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर (Young Man Killed By Crushing With Stones)त्याचे गुप्तांग जाळल्याचंही उघड झालं आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad Murder) या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
[read_also content=”आम्हाला बँकेने रस्त्यावर आणले; सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केला संताप https://www.navarashtra.com/latest-news/the-bank-brought-us-to-the-street-outrage-expressed-by-security-guards-nrdm-225848.html”]
औरंगाबादमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एकपेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाची हत्या होऊन २४ तासांपेक्षाही अधिक काळ झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरुन वाद झाल्यानंतर ही हत्या केली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. मृत तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.