एजाज खान यांचा ‘हाउस अरेस्ट’ या शोमधील अश्लील कंटेंटवरुन चित्रा वाघ आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : रियलिटी शोच्या नावाखाली सुरु असलेल्या अश्लीलतेवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी इंडियाज गॉट लेटेंटवरुन देशभरामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचले होते. त्यानंतर आता ‘हाऊस अरेस्ट’ हा शो वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. शोमध्ये कंटेटच्या नावाखाली दाखवली जाणाऱ्या अश्लीलतेने अक्षरशः कळस गाठला आहे. यावरुन आता भाजप नेत्या व विधानपरिषद आमदार चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
एजाज खान याचा ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये खेळाच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलपणा केला जात आहे. शोमधील स्पर्धकांचे काही एपिसोड हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामधील कंटेटने लहान मुलांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. याचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा शो बंद करण्याची मागणी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेत्या व आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या शोवर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. चित्रा वाघ यांनी लिहिले आहे की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!” एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला. स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे”
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”
एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला. “स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल… pic.twitter.com/SugY7T6RTe — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 1, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे. मी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे!” अशा शब्दांत आमदार चित्रा वाघ यांनी एजाज खान याच्या . हाऊस अरेस्ट शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.