यवतमाळ : भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या यवतमाळमध्ये (Yavatmal) आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी चित्रा वाघ यांना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर मात्र चित्रा वाघ प्रचंड संतापल्या. तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी चित्रा वाघ यांना विचारला. चित्रा वाघ यांनी सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारु नका. तुम्ही न्यायाधीश आहात का? माझा लढा सुरु आहे, असं सांगितलं. तसेच अशा पत्रकारांना बोलावू नका असं नमूद केलं.
[read_also content=”ड्रेकच्या कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकरांच्या गाण्याचं रिमिक्स, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप https://www.navarashtra.com/movies/lata-mangeshkar-song-in-drake-concert-nrsr-343631.html”]
माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनीच संजय राठोड यांना क्लीनचीट दिली आहे. त्यानंतर नवं सरकार स्थापन झालं. संजय राठोड यांना क्लीन चिट असल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. असे असताना तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड यांचे आयुष्य बर्बाद झाले नाही का ? असा प्रश्न स्थानिक पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की आपण न्याय व्यवस्था आहात का? पूजा चव्हाण प्रकरणात मी न्यायालयात गेले आहे. मला शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संबंधित पत्रकाराला सुपारीबाज संबोधले.