U19 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने रचला इतिहास(फोटो-सोशल मीडिया)
The Indian team created history in the Under-19 World Cup : अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा अंतिम सामन्यात भारत १९ वर्षांखालील संघाने इंग्लंड १९ वर्षांखालील संघाचा १०० धावांनी पराभव करत अंडर-१९ विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावले. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ९ बाद ४११ अशी प्रचंड धावसंख्या उभारून भारताने इतिहास रचला आहे. यासह, भारत १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या प्लेऑफ सामन्यात ३५० पेक्षा जास्त धावसंख्या उभारणारा पहिलाच देश ठरला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा हा दुसरा सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम आहे.
यापूर्वी, भारताने प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्याची किमया साधली होती. २०१६ च्या फतुल्ला येथे झालेल्या क्वार्टरफायनलमध्ये भारताने नामिबियाविरुद्ध ६ बाद ३४ अशी धावसंख्या उभी केली होती, ज्यामध्ये ऋषभ पंतने ९६ चेंडूत १११ धावांची संस्मरणीय खेळी साकारली होती.
या सामन्यासह, भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकात तिसऱ्यांदा ४०० धावांचा टप्पा पार करण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी, भारताने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्कॉटलंडविरुद्ध ३ बाद ४२५ आणि २२ जानेवारी २०२२ रोजी युगांडाविरुद्ध ५ बाद ४०५ धावा केल्या होत्या. तसेच, १९ वर्षांखालील विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग ३११ धावा राहिला आहे, जो भारताने अलिकडच्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध उभा केला होता.
शुक्रवारी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने स्फोटक खेळी केली. त्याने फक्त ८० चेंडूत १७५ धावांची विक्रमी खेळी साकारली, ज्यामध्ये त्याने १५ चौकार आणि १५ षटकारांची आतिषबाजी केली. यादरम्यान, वैभवने कर्णधार आयुष म्हात्रे सोबत ९० चेंडूत १४२ धावांची भागीदारी केली, तर त्याने वेदांत त्रिवेदी सोबत ३९ चेंडूत ८९ धावा जोडल्या. परिणामी भारताने इंग्लंड समोर ४११ धावांचे लक्ष्य दिले.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वीच भारताला झटका! सूर्या आर्मीचा ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर
भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर ९ गडी गमावून इंग्लंडसमोर ४१२ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरात इंग्लंडचा संघ ४०.२ षटकात ३११ धावांवरच गडगडला आणि भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.






