• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Citizen Of Mumbai Suffer A Major Blow On The First Day Of The Transporters Strike

वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना पहिल्याच दिवशी मोठा फटका; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 20 टक्के घटली

जड-अवजड वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत मंत्रालयीन पातळीवर मंगळवारी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मालवाहतूक करणारे ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर चालक बुधवारपासून बेमुदत संपावर गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2025 | 07:19 AM
वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना पहिल्याच दिवशी बसला मोठा फटका; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 20 टक्के घटली

वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना पहिल्याच दिवशी बसला मोठा फटका; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 20 टक्के घटली (फोटो सौजन्य- iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : ई-चलान प्रणालीद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईविरोधात मालवाहतूकदारांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला. पहिल्याच दिवशी या संपाचा परिणाम मुंबईत जाणवला. मुंबईतील ट्रक, कंटेनर, टेम्पो वाहतुकीवर ४५ ते ५० टक्के परिणाम झाला. तर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत २० टक्क्यांनी घट झाली.

जड-अवजड वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत मंत्रालयीन पातळीवर मंगळवारी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मालवाहतूक करणारे ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर चालक बुधवारपासून बेमुदत संपावर गेले. या संपामुळे राज्यभरातील अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले आणि औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक काही प्रमाणात ठप्प झाली. मालवाहतूक संघटनांनी ई-चलान प्रणालीद्वारे होणाऱ्या दंडवसुलीविरोधात हा संप पुकारला आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होण्याची शक्यता

मंगळवारी रात्री प्रवासी वाहतूक आणि शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी तूर्तास संपातून माघार घेतली. दोन दिवसांनंतर संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे असोशिएशनकडून सांगण्यात आले. अवजड वाहतूकदार संपावर गेल्यामुळे बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुरवठा साखळी खंडित झाल्यास दरवाढ निश्चित

ग्रामीण आणि शहरी भागात होणारा पुरवठा साखळी खंडित झाल्याने किमतीत वाढ होऊ शकते. सरकारने तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी वाहतूकदारांनी केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यरात्रीनंतर दीड लाख ते दोन लाख ट्रक आणि इतर मालवाहू वाहने संपावर गेली आहेत. दूध, भाज्या आणि औषधे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संपापासून दूर ठेवण्यात आले आहे.

नेमक्या मागण्या काय ?

ई-चलन दंडाची सक्तीची वसुली थांबवणे, सहा महिन्यांपेक्षा जुनी ई-चलान रद्द करणे, विद्यमान ई-चलान दंड माफ करणे, जड वाहनांसाठी अनिवार्य असलेला स्वच्छता नियम रद्द करणे, तसेच महानगरांमध्ये प्रवेश बंदी असणाऱ्या वेळेचा पुनर्विचार करणे यांसारख्या मागण्या आहेत

अनेक वाहतूक संघटनांचा बेमुदत संपाला पाठिंबा

देशातील वाहतूकदारांची सर्वात मोठी संस्था असलेल्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहनतळ महासंघ, ऑल इंडिया बल्क एलपीजी ट्रान्सपोर्टर असोसिएशन आणि नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशनसह इतर अनेक वाहतूक संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारने अद्याप कोणत्याही बैठकीसाठी बोलावलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Citizen of mumbai suffer a major blow on the first day of the transporters strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 07:19 AM

Topics:  

  • Maharashtra Transport
  • Worker Strike

संबंधित बातम्या

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत
1

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत

पंढरीच्या वारीत एसटी झाली ‘मालामाल’; महामंडळाला मिळाले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न
2

पंढरीच्या वारीत एसटी झाली ‘मालामाल’; महामंडळाला मिळाले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न

अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा संप तूर्त मागे; शासनाने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल
3

अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा संप तूर्त मागे; शासनाने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

वाहनांमागे बसवलेल्या सायकल कॅरीयरवर कारवाई होणार का नाही? परिवहन आयुक्तांचे परिपत्रक
4

वाहनांमागे बसवलेल्या सायकल कॅरीयरवर कारवाई होणार का नाही? परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.