मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; पावसाअभावी पिके आली संकटात (File Photo : Crop)
रिसोड : जिल्ह्यातील शेतकरी आधीच यंदा झालेल्या अतिवृष्टीतून सावरत आहे. त्यात रब्बी हंगामाची पेरणी केली. मात्र, हवामान बदलामुळे तूर, हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. खरीप हंगामातील तूर पीक कसेतरी वाचविले असता हे पीक घरी येईल, या आशेवर आस लावून शेतकरी होते. पण, जिल्ह्यात 2 ते 3 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
हेदेखील वाचा : पाण्याची टाकी अंगावर कोसळल्याने मजुराचा मृत्यू; जीर्ण झालेली टाकी पाडण्याचे काम सुरु असतानाच दुर्घटना
खरीप हंगामातील सर्वच पिकांचा नायनाट झाला. प्रमाणापेक्षा अधिक पडलेल्या पावसाने खरिपातील सोयाबीन, कडधान्यासह मिश्र पिकांची झाली. पण, तरी बळीराजाने हार न मानता नव्याने रब्बी पिकासाठी कंबर कसून, पिकांच्या पेरणीची तयारी केली. पण, तूर पीक ऐन फुलोऱ्यावर व शेंगा असताना 3 ते 4 दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे.
ढगाळ वातावरणामुळे तूर आणि हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. तरी पाठोपाठ अशीच काही अवस्था हरभरा पिकाची देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत भर पडली आहे.
परिणामी, तूर, हरभरा, कापूस, कांदा, भाजीपाला आदी पिकांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. लगत 3 दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. वातावरणातील बदलामुळे शेतातील तुरीचा फुलोरा गळत असून, शेवया होत आहेत. तर निरनिराळ्या किडींच्या अंड्यांनी पिकांवर आक्रमण केले आहे. एवढेच नाही तर सकाळच्या वेळी पडणारे धुके देखील शेतपिकासाठी चिंताजनक असल्याचे काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावणार
गतवर्षीसुद्धा तूर पीक फुलोऱ्यावर असताना 2 दिवस धुके पडले होते. त्यामुळे संपूर्ण तुरीचा बहर खचला होता. तूर पिकाचे अक्षरश: खराटे झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी तुरीची सोंगणीसुद्धा केली नाही. शेतकऱ्यांना एकरी 1 ते 2 क्विंटल उत्पादन झाले. यंदाही तीच परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्यात गत 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.
हरभरा, तूर पिकांवर वाढला अळींचा प्रादुर्भाव
हरभरा, तूर या पिकांवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. फवारणीसाठी महागडी कीटकनाशके खरेदी करण्यास पैशांअभावी पुन्हा अडचण येणार आहे. खरीप हंगामातील जास्त पावसाने सर्वच पिकांचा नायनाट केला. सरकारची नुकसान भरपाई ही पेरणीला देखील पुरली नाही. त्यामुळे सर्वच शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे.
हेदेखील वाचा : समंदर लौटकर आ गया है…; फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया