Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decision : मोठी बातमी! आदिवासी शिक्षणाला चालना; धाराशिव-सोलापूरसाठी विशेष मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी विशेष मंजुरी देण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 05, 2026 | 03:22 PM
मोठी बातमी! आदिवासी शिक्षणाला चालना; धाराशिव-सोलापूरसाठी विशेष मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय

मोठी बातमी! आदिवासी शिक्षणाला चालना; धाराशिव-सोलापूरसाठी विशेष मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय

Follow Us
Follow Us:

Maharashtra Cabinet Decision News Marathi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (५ मे) महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी निर्णय घेण्यात आला असून, सोलापूरच्या शासकीय तंत्रानिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष (२०२६-२७) पासून पदवी स्तरावरील तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात फायदा होईल आणि आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद! अवघ्या ३ दिवसांत १० हजारांवर नोंदणी; ३,८०० कर्मचारी मैदानात

मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी. डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार.
(आदिवासी विकास विभाग )

सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत लैंगिक शोषणाच्या आरोपींना पॅरोल न देण्याचे निर्देश दिले आहेत. लैंगिक प्रकरणांमधील ८० ते ९० टक्के आरोपी त्याच गुन्ह्यात अडकून पॅरोलवर सुटतात आणि त्या काळात ते वारंवार तेच गुन्हे करतात. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, अशा गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल देऊ नका, असा कायदा केला होता. २-३ वर्षे अस्तित्वात राहिले असते. पण अखेरीस न्यायालयाने ते रद्द केले. देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि न्याय विभागाला अशा सूचना दिल्या आहेत की आता कायदा पुन्हा आणला जाईल.

आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

Web Title: Cm devendra fadnavis cabinet members 3 decisions special for tribal education dharashiv and solapur engineer collage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • cabinet decisions
  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
3

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.