Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भ नदीजोड प्रकल्प अन् गडचिरोलीचा नक्षलवाद संपवण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. तसेच राज्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 25, 2024 | 01:11 PM
दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा रिलायन्सशी तब्बल 3 लाख कोटींचा करार

दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा रिलायन्सशी तब्बल 3 लाख कोटींचा करार

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. अनेक मुद्द्यांवरुन महायुती सरकारला घेरले जात आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये देखील विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक राजकीय विषयावर भाष्य केले आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता अडचणीवर आणि मर्यांदावर मात करुन जनतेची सेवा करणार असल्याचे सांगितले आहे.

2014 मी मुख्यमंत्री झाल्यावर अनेकांना शंका

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोष यश मिळाले. भाजपला देखील राजकीय जीवनातील उच्चांक 132 जागा मिळवता आल्या. फेक नॅरेटिव्हचा मोठा फटका आम्हाला लोकसभेला बसला होता. मात्र विधानसभेमध्ये लोकांचे मोठा पाठिंबा मिळाला. अर्थात या बहुमतामुळे आमची जबाबदारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोणतेही बहुमत हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतात. अपेक्षा, आव्हान, अडचणी आणि मर्यादा देखील काम करताना येत असतात. पण यावर मात करुन जनतेच्या मनातील काम झाली पाहिजे, असा महाराष्ट्र तयार झाला पाहिजे. मी 2014 मला मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनामध्ये देखील शंका होत्या. हा मंत्री राहिलेला नाही तर मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल? अतिशय नवखं काम ह्यांना मिळालं आहे, सातत्याने विदर्भाच्या प्रश्नांवर बोलणारा व्यक्ती पश्चिम महाराष्ट्राचे काम कसे करेल असा प्रश्न निर्माण केला जात होता,” असे मत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गडचिरोलीमध्ये निकरच्या लढाईची शक्यता

पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “यापूर्वीच्या कार्यकाळामध्ये विदर्भातमध्ये काम केले पण त्याचबरोबर राज्यातील इतर कोणत्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही. विदर्भामध्ये सिंचनाचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प हाती घेतले. जवळ जवळ 80 सिंचन प्रकल्प पूर्ण केले. आता अनेक प्रकल्प पूर्णत्वापर्यंत आणले आहेत. पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प देखील आपण पुन्हा सुरु केले आहेत. उद्योगधंदे, बांधकाम आणि महत्त्वाच्या भागांमध्ये उंच भरारी तेव्हाच्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राने घेतली. गेल्या अडीच वर्षांत उपमुख्यमंत्री म्हणून जी संधी मिळाली त्यावेळी देखील उर्जा विभागामध्ये पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप तयार करुन ठेवला आहे. विजेचे दर आपण कमी करु शकू अशी परिस्थिती पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये येईल. सहा नदी जोड प्रकल्पांची काम आपण हाती घेतली आहेत. ही सहा नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राचा पूर्णपणे बदल करणारी आहेत.  गडचिरोलीचा विकास होत आहे. नक्षलवाद कमी होत आहे. ज्या भागात आपण जात नव्हतो त्या भागांमध्ये आता खोलवर जाता येत आहे. निकरची लढाई होण्याची शक्यता आहे. यामधून आपण गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचे काम आपण करणार आहोत. महाराष्ट्राच्या समोर सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. यावर आळा घालण्याचा प्रयत्न असणार आहे. सर्व आवास योजनांमध्ये मिळणाऱ्या घरांना सोलार दिले जाणार आहे. विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न असणार आहे.जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या ईव्हीएम मशीनवरील संशयावर मत व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “केंद्राच्या मदतीने महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे.  सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही. सत्ता हे सेवा करण्याचा मार्ग आहे. झोपलेल्यांना जागे करता येते मात्र झोपेचे नाटक करणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही. कॉंग्रेस पक्ष हे पूर्णपणे जाणतो की, ईव्हीएम मशीन हे पूर्णपणे सुरक्षित आहे. ईव्हीएमला आव्हान देणारे सर्व दावे खोटे ठरले आहेत. यासाठी कॉंग्रेस पार्टी काहीही करु शकली नाही. कॉंग्रेसची ही नीती राहिली की, निवडणूक हारली की ईव्हीएमला दोष देणार आणि ते निवडणूक जिंकले की लोकशाही जिंकली असं सांगतात. पण आता त्यांना उत्तर द्यायला माझी किंवा निवडणूक आयोगाची गरज नाही. कॉंग्रेसला उत्तर हे ओमर अब्दुला आणि ममता बॅनर्जी यांनी देखील दिले आहे,” असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

 

Web Title: Cm devendra fadnavis live expressed views on vidarbha irrigation scheme and gadchiroli naxalism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 01:11 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • Gadchiroli Naxalites

संबंधित बातम्या

“आमच्याशी लढायचे असेल तर…”; ED च्या ‘त्या’ छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू
1

“आमच्याशी लढायचे असेल तर…”; ED च्या ‘त्या’ छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
2

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?
3

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…
4

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.