Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Juvenile Age Limit: बाल गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Juvenile Age Limit: गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक गुन्हेगारी कारवायांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत आहेत. अत्यांना अटक करण्याऐवजी त्यांना निरीक्षण गृहात ठेवण्याच्या कायदेशीर तरतुदीचा गैरफायदा घेतला जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 01, 2026 | 04:20 PM
Juvenile Age Limit, Devendra Fadnavis, Maharashtra Assembly, Law Updates, Mumbai Crime News

Juvenile Age Limit, Devendra Fadnavis, Maharashtra Assembly, Law Updates, Mumbai Crime News

Follow Us
Follow Us:
  • बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची तयारी
  • लातूरमध्ये घडलेली घटना कौटुंबिक वादातून घडलेली वैयक्तिक स्वरूपाची
  • संघटित गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्या आणि व्यक्तींविरुद्ध अधिक कठोर कायदेशीर उपाययोजना
Juvenile Age Limit Maharashtra: राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (30 जून) विधानसभेत याबाबत घोषणा केली. यासोबतच गुन्हेगारीच्या कारवाया आणि अमली पदार्थांच्या वितरणासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक कायदेशीर बदल करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जालना जिल्ह्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या घटनांबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. खोतकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही पुरवणी प्रश्न उपस्थित केला.

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?

लातूर प्रकरणावर काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

लातूरमधील अलीकडील घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लातूरमध्ये घडलेली घटना कौटुंबिक वादातून घडलेली वैयक्तिक स्वरूपाची होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून, ज्यांचा सहभाग प्राथमिक तपासात समोर आला आहे, त्या अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक गुन्हेगारी कारवायांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत आहेत. अत्यांना अटक करण्याऐवजी त्यांना निरीक्षण गृहात ठेवण्याच्या कायदेशीर तरतुदीचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्यात अधिक कठोर तरतुदी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

उच्चस्तरीय समिती करणार अभ्यास

“१६ वर्षांखालील मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रवृत्तीचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच संघटित गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्या आणि व्यक्तींविरुद्ध अधिक कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याचाही सरकार विचार करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने

राज्यात वाढत्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह पुनर्वसनावरही विशेष भर दिला जात असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली. बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ अंतर्गत राज्यातील सर्व पोलीस दलांमध्ये विशेष बाल पोलीस युनिट्स कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून ‘केअर’ (Counselling and Reformative Education) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कदम म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी पोलीस विभागाकडून सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, कायद्याचे पालन आणि सामाजिक जागरूकतेबाबत नियमित जनजागृती मोहीम, समुपदेशन सत्रे आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या जात आहेत.

 

 

Web Title: Cm devendra fadnavis proposes lower juvenile age limit 16 years assembly announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Assembly
  • Mumbai crime news

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
1

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
2

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
3

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
4

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.