
नावाचा वापर करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी दुय्यम निबंधकाकडे तक्रार; पुरंदरच्या सहकार विभागाकडे दाद
सातारा : गोडोली सातारा येथील संजय हनुमंत वडर (धोत्रे), (रा. साईनगर) यांच्या नावाने निरा तालुका पुरंदर येथील दत्त मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा फायदा घेऊन त्यांच्या नावावर अनेक खोटे व्यवहार करण्यात आले आहेत. या व्यवहारात खोटे अंगठे उठवूनही व्यवहार झाल्याची माहिती आहे. या विरोधात वडर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर यांच्याकडे दाद मागितली आहे.
या तक्रार पत्रात नमूद आहे की, वडर हे या संस्थेचे १९९६ सालापासून सभासद आहेत. मात्र, त्यांच्या नावावर त्यांना कोणतीही कल्पना न देता अनेक व्यवहार त्यांचे खोटे अंगठे उठवून करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेचे चेअरमन दिलीप हनुमंत वडर (धोत्रे) यांनी स्वतःहून हे तक्रारदारांना न विचारता परस्पर केले आहेत. माझ्या अंगठ्याची फॉरेन्सिक तपासणी करून ते अंगठे अनेक कागदपत्रांवरील अंगठ्याच्या शिक्याशी जुळतात का याची खातर जमा करावी आणि संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार संजय वडर (धोत्रे) यांनी दिला आहे.
नाशिकमध्येही फसवणुकीची घटना
शहरातील चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जमिनींवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवायचे २० टक्के क्षेत्र हडप करण्यासाठी मोठा गैरप्रकार समोर आला आहे. बनावट मोजणी नकाशे आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे खोटे शिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक प्रकरणे आली उजेडात
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने या प्रकरणांची पडताळणी केली. म्हसरूळ, आडगाव, देवळाली, गंगापूर यांसह विविध ११ गावांमधील १०८ प्रकरणांची तपासणी करण्यात आली. यात धक्कादायक बाब अशी की, ४९ प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात मोजणी झालेली नसतानाही भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट सही- शिक्के वापरून ‘हिस्सा फार्म नंबर १२’ आणि ‘गट बुक नकाशे तयार करण्यात आले.
हेदेखील वाचा : Nashik News : विधवा महिलांच्या आयुष्यात नवी पहाट; जुनी बंधनं झुगारत केली रंगांची उधळण