Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाना पटोलेंचा अरविंद केजरीवालांवर निशाणा, म्हणाले; औकातीत राहून…

अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे. बेईमान कोण? व भाजपाची बी टीम कोण? हे देशातील जनतेला माहिती आहे, अरविंद केजरीवालांनी औकातीत रहावे, असे खडेबोल नाना पटोले यांनी सुनावले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2025 | 12:59 PM
नाना पटोलेंचा अरविंद केजरीवालांवर निशाणा, म्हणाले; औकातीत राहून...

नाना पटोलेंचा अरविंद केजरीवालांवर निशाणा, म्हणाले; औकातीत राहून...

Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून, झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्य़क्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरु आहे. ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पण या अधिकारावरच भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपा सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे. काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून, निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे असे पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे, नोकर भरती करण्याचे आश्वासन देऊन भाजपा युती सत्तेत आली आहे पण आता हे सरकार कर्जमाफी देण्यासाठी, नोकर भरतीसाठी निधी नाही असे सांगत आहे पण दुसऱ्याकडे सरकार बगलबच्च्यांवर सवलतींची खैरात करत साखर कारखाण्यांचे १०० कोटी रुपयांचे व्याज माफ करते हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. महागाई कमी करण्याऐवजी एसटी, रिक्षा व टॅक्शीची भाडेवाढ करून जनतेला महागाईच्या संकटात लोटत आहे, असेही पटोले म्हणाले.

अरविंद केजरीवालांनी औकातीत रहावे…

‘आप’ने दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बदनामी करणारी पोस्टर्स लावल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे. बेईमान कोण? व भाजपाची बी टीम कोण? हे देशातील जनतेला माहिती आहे, अरविंद केजरीवालांनी औकातीत रहावे, असे खडे बोल नाना पटोले यांनी सुनावले. या कार्यक्रमाला CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, वरिष्ठ नेते हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, श्रीरंग बरगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Congress leader nana patole has criticized arvind kejriwal nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • BJP
  • Congress
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Nana patole

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
2

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
3

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
4

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.