Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “… ते देवाचे अवतार आहेत”; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर सडकून टीका

आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 02, 2025 | 09:53 PM
Maharashtra Politics: “… ते देवाचे अवतार आहेत”; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर सडकून टीका
Follow Us
Close
Follow Us:
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी पार पडले मतदान
21 डिसेंबरला जाहीर होणार निकाल
कॉँग्रेसची निवडणूक आयोगावर जोरदार टीका

पुणे: नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुती या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रास भंग केला. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हा गंभीर प्रश्न आहे.

आजच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ‘पैसा फेक तमाशा देख’, वगनाट्य रंगले, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.पुणे येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले. भाजपा, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व नियम पायदळी तुडवले. सत्ताधारी महायुतीने गाव तिथं बारा भानगडी, करून ठेवल्या आहेत. लोकशाही व संविधानाची पायमल्ली करण्यात आली.

निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव, बोगस मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: काँग्रेसची मागणी

काँग्रेसचे १६५ नगराध्यक्षपदांचे उमेदवार…
या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दिसला नाही या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्ष पंजा या पक्षाच्या चिन्हावर १६५ नगराध्यक्षपदांसाठी रिंगणात उतरलेली आहे. प्रचारातही काँग्रेस नेत्यांनी विविध भागात प्रचार सभा घेतल्या आहेत. मी स्वतः राज्यभर ६५ प्रचार सभा घेतल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीत नव्हती या आरोपात काहीही तथ्य नाही. काँग्रेस व विरोधी पक्षांचे नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी झाले तरी पुन्हा फोडाफोडीचा प्रकार सत्ताधारी करणार नाहीत कशावरून, पण खरा प्रश्न आपली लोकशाही कोणत्या दिशेने जात आहे हा आहे आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

भाजपाला रावणापेक्षा जास्त अहंकार..
छत्रपती शिवाजी महाराजांना भाजपाची टोपी व गमछा घातल्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा व त्यांचे नेते महापुरुष व देवांपेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजतात, ते देवाचे अवतार आहेत. भाजपाला रावणापेक्षा जास्त अहंकार झाला आहे, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला..

निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव

नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण बुलढाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये भरून लोकांना बुलढाण्यात आणून बोगस मतदान केले पण पोलीस व प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. बोगस मतदान करणारे व त्यांना तसे करावयास लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Web Title: Congress president harshwardhan sapkal criticizes to bjp about local body election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 09:43 PM

Topics:  

  • Election Comission
  • Harshwardhan Sapkal
  • Maharashtra Local Body Election
  • Mahayuti

संबंधित बातम्या

वडगावात नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांची मोठी गर्दी; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
1

वडगावात नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांची मोठी गर्दी; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

नगराध्यक्षांसह उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद; EVM मध्ये तांत्रिक बिघाडानंतरही सोलापूरमध्ये मतदान जोरदार
2

नगराध्यक्षांसह उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद; EVM मध्ये तांत्रिक बिघाडानंतरही सोलापूरमध्ये मतदान जोरदार

Local Body Elections : विरोधक जर आले तर पालिकेत पत्रकारांना टोल द्यावा लागेल; मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचे टीकास्त्र
3

Local Body Elections : विरोधक जर आले तर पालिकेत पत्रकारांना टोल द्यावा लागेल; मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचे टीकास्त्र

Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी आमदारांचा वाढला रुबाब? संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्राचे नियम बसवले धाब्यावर
4

Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी आमदारांचा वाढला रुबाब? संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्राचे नियम बसवले धाब्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.