Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरविकास मंत्री एकनाथ यांनीच मुंबई केली अनाथ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा टोला

भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळेच मुंबई जलमय झाली, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 29, 2025 | 05:19 PM
नगरविकास मंत्री एकनाथ यांनीच मुंबई केली अनाथ; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा टोला

नगरविकास मंत्री एकनाथ यांनीच मुंबई केली अनाथ; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा टोला

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळेच मुंबई जलमय झाली, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. नगरविकास मंत्री शिंदे एकनाथ यांनीच मुंबई अनाथ केली, असंही लोंढे म्हणाले.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपा युती सरकारचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले, ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मागील १० वर्षापासून नगरविकास विभागाचे मंत्री आहेत, पण त्यांच्या विभागाने मुंबईची पुरती वाट लावली आहे, पावसाने नगरविकास विभागाच्या धोरणांचे धिंडवडे काढले. मुंबईच्या जनतेची कसलीही काळजी न करता केवळ भ्रष्टाचारात हे सरकार आकंठ बुडाले आहे. हवामान खात्याने इशारा दिला असताना त्याकडे दुर्लक्ष का केले? बीएमसीने आगाऊ सूचना का दिल्या नाहीत? पावसाच्या (SOP) असतात त्याची अंमलबजावणी का झाली नाही ? पाऊस ८ वाजता सुरु झाला आणि १२ वाजेपर्यंत प्रशासन झोपले होते का? असे प्रश्न उपस्थित केले.

मेट्रो-३ चे काम अपूर्ण असतानाही त्याचे उद्घाटन करण्याची घाई का केली? आचार्य अत्रे स्टेशनमध्ये पाणी शिरले त्याची जबाबदारी कोणाची? मेट्रो स्टेशन कसे असावे त्यासाठी काही तांत्रिक बाबी आहेत. या स्टेशनला तीन प्रवेशद्वार तर तीन बाहेर पडण्याचे दरवाजे असायला हवेत पण या स्टेशनवर दोनच दरवाजे आहेत. या त्रुटींची तपासणी कोणत्या अधिकारी वा सल्लागाराने केली होती का? ४० मीमी पाऊस पडला तरी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरु शकते याची माहिती कोणालाच नव्हती का? बीएमसी अधिकाऱ्यांची ड्युटी मंत्र्यांच्या शिष्टाचारासाठी लावली आहे, मुंबईकरांच्या कामासाठी नाही असे लोंढे म्हणाले.

फक्त आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, जूहू, वांद्रे भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले पण चर्चा फक्त मेट्रो स्टेशनची झाली. मुंबई जलमय झाली पण बीएमसीचे अधिकारी, ठेकेदार किंवा नगरविकास विभागाच्या कोणत्याच व्यक्तीवर कारवाई का झाली नाही. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मग कारवाई कोणावर केली याचे उत्तरही त्यांनी द्यावे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे अतुल लोंढे म्हणाले.

Web Title: Congresss atul londhe has criticized minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Atul Londhe Congress
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Eknath Shinde
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
1

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
3

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
4

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.