Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारळी प्रकल्पाच्या देयकासाठी ठेकेदार आक्रमक; 17 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या तारळी धरण वळण रस्त्याच्या कामाची अंमलबजावणी सुरू असूनही संबंधित देयकांची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. कामासाठी आवश्यक असलेले काँक्रिट मिक्स डिझाइन मे २०२५ मध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागाने तयार करून मंजुरीसाठी पाठविले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 13, 2026 | 01:43 PM
तारळी प्रकल्पाच्या देयकासाठी ठेकेदार आक्रमक; 17 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

तारळी प्रकल्पाच्या देयकासाठी ठेकेदार आक्रमक; 17 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

Follow Us
Follow Us:

सातारा : तारळी धरण वळण रस्त्याच्या कामाचे प्रलंबित देयक मिळत नसल्याने ठेकेदार विजयसिंह पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात होत असलेल्या विलंबामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात १७ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या तारळी धरण वळण रस्त्याच्या कामाची अंमलबजावणी सुरू असूनही संबंधित देयकांची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. कामासाठी आवश्यक असलेले काँक्रिट मिक्स डिझाइन मे २०२५ मध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागाने तयार करून मंजुरीसाठी पाठविले होते. त्यास ऑक्टोबर २०२५ मध्ये मान्यता मिळाली. मात्र, त्यानंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही वेळेत झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित प्रकरणात सातारा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत असल्याने देयक अडकल्याचा आरोपही त्यांनी केला. कामासाठी कर्ज घेऊन मोठी आर्थिक गुंतवणूक केल्यामुळे सध्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Junnar Gram Panchayat Election : राजुरी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर ! १७ सदस्यांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

पाटील यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. येत्या काही दिवसांत प्रश्न निकाली न निघाल्यास १७ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेस उपस्थित राहून त्यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रलंबित देयकांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.

Katraj Dairy Pune: कात्रज दूध संघाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू! कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस दूध संकलनाचे गंभीर आरोप

Web Title: Contractor aggressive over payment for tarali project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर! गावकऱ्यांनी मृत तळ्याला दिली नवसंजीवनी; भर उन्हाळ्यातील कष्टाला पावसाळ्यात आले यश
1

थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर! गावकऱ्यांनी मृत तळ्याला दिली नवसंजीवनी; भर उन्हाळ्यातील कष्टाला पावसाळ्यात आले यश

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
2

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
3

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश
4

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.