Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : ४७ अंशात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; पत्र्याच्या खोल्यांत स्कॉलरशिप परीक्षा

कडक उन्हाळ्यामध्ये विद्यालयातील सर्व वर्गखोल्या पत्र्याच्या असल्याने कडक उन्हात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2026 | 03:20 PM
Controversy over Exam Center Arrangements in Tin Sheds for 4th Grade Scholarship Test nanded news

Controversy over Exam Center Arrangements in Tin Sheds for 4th Grade Scholarship Test nanded news

Follow Us
Follow Us:

Nanded News : लोहा : लोहा तालुक्यातील सावरगाव (नसरत) येथे दि. २६ एप्रिल रोजी होणारी चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेची केंद्रव्यवस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथील शिवनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून, विद्यालयातील सर्व वर्गखोल्या पत्र्याच्या असल्याने कडक उन्हात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र असून नांदेड जिल्ह्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे. अशा परिस्थितीत लहान विद्यार्थ्यांना पत्र्याच्या खोल्यांमध्ये परीक्षा देण्यास भाग पाडणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळ असल्याचा संतप्त आरोप पालकांकडून केला जात आहे.

हे देखील वाचा : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर

आरोग्याशी तडजोड नाही; पालकांचा इशारा

उष्माघाताचा धोका लक्षात घेता, एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित शिक्षण विभागावर राहील, असा इशाराही पालकांनी दिला आहे. विशेष म्हणजे, संबंधित विद्यालयातील खोल्या पत्र्याच्या असल्याची माहिती शिक्षण विभागाला असतानाही येथेच परीक्षा केंद्र देण्यात आल्याने शंका व्यक्त केली जात आहे. यामागे नेमके कारण काय प्रशासकीय हलगर्जीपणा, आर्थिक व्यवहार की राजकीय दबाव-याबाबत पालकांत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, रिसनगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या या भागात केंद्रप्रमुख पद रिक्त असून शिक्षण विस्तार अधिकारीही उपलब्ध नाहीत. तक्रार नोंदवण्यासाठी पालकांनी गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र अनेक वेळा फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने नाराजी अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, “विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड मान्य नाही. अशा परिस्थितीत आम्ही मुलांना परीक्षेला बसवणार नाही,” असा ठाम पवित्रा पालकांनी घेतला आहे. पर्यायी, सुरक्षित व सुसज्जा केंद्रावर परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

हे देखील वाचा : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष

उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक घामाघूम

लग्न, कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. राज्यात सध्या उन्हाचा पारा ४७ अशावर पोहोचला असुन हा पारा येत्या आठवडाभरात कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उन्हाच्या चटत्वयामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच धाम निघत असून राज्यासह भोकर तालुक्यातील देखील तापमान मागील आठ दिवसांपासून चांगलेच तापत आहे. या आठवड्यात सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे.

भर दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे. व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुटीचा दिवस असतानाही नागरिकांनी घरीच बसून राहणे पसंद केले. असुन या आठवड्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ व विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र, या कार्यक्रमांकडेही उन्हाच्या भिती पोटी आनेक नागरिकांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले, वाचण्यासाठी उन्हाच्या तडक्यातून मोटारसायकलस्वार डोक्यावर हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत.

Web Title: Controversy over exam center arrangements in tin sheds for 4th grade scholarship test nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • heat wave
  • Nanded
  • nanded news
  • summer heat

संबंधित बातम्या

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त
1

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.