Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा

Dahi Handi 2026 Jai Jawan: राज्यभरात आज, 5 सप्टेंबर 2026 रोजी दहीहंडीचा जल्लोष सुरू असून मुंबई-ठाण्यात उंच थरांची चुरस पाहायला मिळत आहे. जय जवान गोविंदा पथकाने यंदा 10 थर रचण्याचे प्रमुख लक्ष्य ठेवले आहे. मागील चार महिन्यांपासून पथकाचा कसून सराव सुरू असल्याचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 05, 2026 | 11:13 AM
'1..2..3 नाही तर', जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, प्रशिक्षक संदीप ढवळेंची घोषणा

'1..2..3 नाही तर', जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, प्रशिक्षक संदीप ढवळेंची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • ‘2009 मध्येच 9 थर लावले, यंदा लक्ष्य 10 थरांचे’
  • जय जवान गोविंदा पथक विक्रमासाठी सज्ज
  • चार महिन्यांच्या सरावानंतर जय जवानचा 10 थरांसाठी ‘महाप्रयत्न’
Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘गोविंदा आला रे आला…’च्या जयघोषात आज राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये गोविंदा पथके मानवी मनोरे रचण्यासाठी सज्ज झाली आहेत. यंदा विशेषतः मुंबई आणि ठाण्यात 10 आणि 11 थरांचा विक्रम करण्यासाठी काही पथकांनी कंबर कसल्याने दहीहंडीचा थरार शिगेला पोहोचला आहे.

याच पार्श्वभूमीवर जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी पथकाच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या या महत्त्वाच्या दिवसासाठी पथकातील गोविंदांनी मागील चार महिन्यांपासून कसून सराव केला आहे. यंदा पथकाचे प्राथमिक लक्ष्य 10 थर रचण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

काय म्हणाले संदीप ढवळे?

“10 थरांचा प्रयत्न असेल. त्यानंतर मुलांची स्थिती, त्यांची कामगिरी आणि परिस्थिती पाहून 11 थरांसाठी जायचे की नाही, याचा निर्णय घेऊ,” अशी भूमिका संदीप ढवळे यांनी मांडली. त्यामुळे जय जवान पथकाकडून 10 थर यशस्वी झाल्यास 11 थरांचा ऐतिहासिक प्रयत्न पाहायला मिळण्याची उत्सुकता वाढली आहे.

जय जवान पथकाला उंच मानवी मनोरे रचण्याचा मोठा अनुभव आहे. ढवळे यांनी सांगितल्यानुसार, 2009 मध्येच पथकाने 9 थर रचले होते. त्यामुळे यंदा 10 थरांचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने पथकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या दहीहंडीमध्ये उंच थरांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. काही पथकांनी 10 ते 11 थर रचण्याचा संकल्प केला आहे. नऊ थर रचणाऱ्या पथकांची संख्याही वाढल्याची माहिती समोर येत आहे.

71 लाख रुपयांची बक्षिसे

दुसरीकडे ठाण्यातील दहीहंडी उत्सवही मोठ्या बक्षिसांमुळे चर्चेत आहे. स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात एकूण 71 लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार असून, हा महोत्सव ‘सेलिब्रिटी हंडी’ म्हणूनही ओळखला जातो. ठाण्यातील मानाच्या टेंभी नाका दहीहंडीमध्ये मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या आहेत. विजेत्या पथकांना प्रत्येकी 1 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा 254 सार्वजनिक दहीहंडींचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Dahi Handi Wishes: गोविंदाच्या जयघोषात रंगू दे उत्सव! नातेवाईक आणि मित्रपरिवाराला पाठवा दहीहंडीच्या सुंदर शुभेच्छा

Web Title: Dahi handi 2026 jai jawan govinda pathak sandeep dhawale eyes 10 layers may attempt 11 layers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • Mumbai

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन
2

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
3

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
4

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.