उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो- ट्विटर)
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
शिवसेना चांद्यापासून बांद्यापर्यन्त पोहोचली
फेसबुक लाईव्हने पक्ष वाढत नाही – एकनाथ शिंदे
Eknath Shinde: राज्यात 21 तारखेला नगरपालिका, नगरपंचयात निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने मोठे यश प्राप्त केले आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा सत्कार केला. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आपला पक्ष राज्यभर पोहोचला आहे. चांदा ते बांदापर्यन्त आपला पक्ष पोहोचला आहे. कोकणात वनसाइड निवडणूक झाली. तुम्ही मिळवलेला विजय हा ऐतिहासिक आहे. नकली सब घर पे बैठे हे, असली मेरे सामने बैठे हे.
◻️ LIVE 📍 दादर, मुंबई
🗓️ 23-12-2025 📹 नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सत्कार समारंभ – लाईव्हhttps://t.co/E5VHlqX5wd — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 23, 2025
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सत्य परेशान हो सकता हे, पराजित नही हो सकता हे. सांगोला जिल्ह्यात शहाजीबापू यांनी सर्वांना आडवे केले.






