पिंपरी : इंद्रायणी नदीतील वाढते प्रदूषण, तीर्थक्षेत्र आळंदी नदी पात्रातील पाण्यावर आलेला फेस अशा गंभीर विषयावर चर्चा करुन कायम स्वरूपी इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बैठकीत सदस्य नितीन गोरे यांनी केली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वतीने पुणे विभागीय कार्यालयात इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाययोजना यासाठी आयोजित बैठकीत मंडळाचे सदस्य गोरे बोलत होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाची बैठक
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, पिंपरी- चिंचवड महापालिका, आळंदी नगरपरिषद, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे पुणे कार्यालयाचे विभागीय अधिकारी रवी आंधळे, उपविभागीय अधिकारी मंचक जाधव, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पिंपरी महापालिकेचे योगेश आल्हाट, विलास देसले, सोहन निकम, खेड पंचायत समितीच्याश्रीमती धोंडे, माणिक शिंदे, चिन्मय नागपूरकर यादी उपस्थित होते