Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon Factory Election : अजित पवारांच्या उमेदवारीने ‘माळेगाव’ची निवडणूक गाजणार; युगेंद्र पवारही उद्या…

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने माळेगाव कारखान्याची निवडणूक राज्यात गाजणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 29, 2025 | 02:27 PM
अजित पवारांच्या उमेदवारीने ‘माळेगाव’ची निवडणूक गाजणार; युगेंद्र पवारही उद्या...

अजित पवारांच्या उमेदवारीने ‘माळेगाव’ची निवडणूक गाजणार; युगेंद्र पवारही उद्या...

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने माळेगाव कारखान्याची निवडणूक राज्यात गाजणार आहे. विरोधी गटाचे नेते चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांनी देखील ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे घोषित केले आहे, त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार हे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ३०) पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याने माळेगावची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २२ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २७ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सह, कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्यासह यांच्या समर्थक उमेदवारांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघतून दाखल झाल्याने ही निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेत आली आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ही निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे जाहीर करत आपण स्वतः या निवडणुकीत उतरणार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा उमेदवार १२ जून रोजी प्रचाराच्या शुभारंभावेळी घोषित करणार असल्याचे त्यांनी या सभेत म्हटले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या या वक्तव्यामुळे संभाव्य अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? याबाबत विविध तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.

अजित पवारांच्या खेळीमागे राजकीय गणिते?

सध्या कारखान्याचे अध्यक्षपद ॲड केशवराव जगताप यांच्याकडे आहे. अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पणदरे गटातील ॲड केशवराव जगताप यांची अध्यक्षपदी निवड करून उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्वांना धक्का दिला होता. मात्र या निवडणुकीत अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून ते कोणाच्या नावाची घोषणा करतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वतःची उमेदवारी दाखल करून उपमुख्यमंत्री पवार अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्याच नावाची घोषणा करतात की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या या खेळीमागे मोठी राजकीय गणिते असल्याचे बोलले जात आहे.

तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता

दरम्यान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीपासून अलिप्त राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मात्र उतरणार असल्याचे दिसत असून या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी दिनांक ३० मे रोजी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या निवडणुकीत उतरल्यास निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Deputy chief minister ajit pawar has filed his application for the malegaon factory election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Malegaon Sugar Factory
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण
1

Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटही उतरणार? खासदार राऊतांच्या ‘या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग
2

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ
3

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी
4

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.