Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : धाराशिवमध्ये बनावट खतांचा भांडाफोड; कृषी सेवा केंद्र सील करण्याचे आदेश

खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2026 | 01:43 PM
धाराशिवमध्ये बनावट खतांचा भांडाफोड; कृषी सेवा केंद्र सील करण्याचे आदेश

धाराशिवमध्ये बनावट खतांचा भांडाफोड; कृषी सेवा केंद्र सील करण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:

धाराशिव : खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना चक्क लालसर मातीची विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कृषी विभाग, खत विक्रेते आणि संबंधित कंपनीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी संघटनेला काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात बोगस रासायनिक खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या.

 

पाच वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप

शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार नवीन नसून गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या माथी बनावट खत मारले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित कंपनी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत असून भरून विक्री केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर प्रकार

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत बनावट खतांचा हा प्रकार उघड झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

खत आणि कीटकनाशकांच्या विक्रीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. खताच्या नावाखाली माती विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये. या रॅकेटमागील सूत्रधारांना अटक करुन त्यांची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करावी, अशी भुमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा : आईच्या प्रियकराने केला तीन वर्षांच्या बालकाचा खून; आधी महिलेसोबत वाद घातला अन् नंतर…

ट्रकमधील खत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

या प्रकाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संशयित खताने भरलेला ट्रक थेट धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही पोती उघडून पाहण्यात आली असता त्यामध्ये खताऐवजी माती असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित कंपनी व विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच संबंधित कृषी सेवा केंद्र सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: A major racket involving counterfeit chemical fertilizers has been uncovered in dharashiv district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.