Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवन ऊर्जा प्रकल्पांचा ‘काळा’ कारभार! मोबदला मागणाऱ्या खानापूरच्या शेतकऱ्यांवर ‘खंडणी’चे गुन्हे; कंपन्यांचा मनमानी कारभार उघड

करारनाम्यातील अटींचे उल्लंघन करणे आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा खानापूर (ता. वाशी) येथील घटनेतून समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 03:40 PM
पवन ऊर्जा प्रकल्पांचा 'काळा' कारभार! मोबदला मागणाऱ्या खानापूरच्या शेतकऱ्यांवर 'खंडणी'चे गुन्हे (Photo Credit- X)

पवन ऊर्जा प्रकल्पांचा 'काळा' कारभार! मोबदला मागणाऱ्या खानापूरच्या शेतकऱ्यांवर 'खंडणी'चे गुन्हे (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • पवन ऊर्जा प्रकल्पांचा ‘काळा’ कारभार!
  • मोबदला मागणाऱ्या खानापूरच्या शेतकऱ्यांवर ‘खंडणी’चे गुन्हे
  • कंपन्यांचा मनमानी कारभार उघड
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्ह्यात पवन ऊर्जा प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कमी किमतीत जमिनी मिळविणे, करारनाम्यातील अटींचे उल्लंघन करणे आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा खानापूर (ता. वाशी) येथील घटनेतून समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजता खानापूर शिवारात पवनचक्की प्रकल्पासाठी सबस्टेशन साहित्य घेऊन जाणारी वाहने अडविण्यात आली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दत्तात्रय शिवाजी माने (वय ४१, रा. शिरगाव ता. वाई जि. सातारा, सध्या रा. मैत्री पार्क, वाशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्यात दगडू जुळजीराम लगाडे, रणजित दगडू लगाडे, धम्मदीप रणजित लगाडे, प्रशांत रत्नप्रकाश शिंदे, आकाश अच्युत लगाडे, किरण वसंत शिंदे, अविनाश राजेंद्र लगाडे (सर्व रा. खानापूर ता. वाशी) तसेच निलेश लगाडे (रा. इंदापूर ता. वाशी) यांचा समावेश आहे.

तक्रारीनुसार, संबंधित कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी नांदगाव शिवारात सबस्टेशन उभारणीसाठी साहित्य वाहतूक करणारी वाहने आरोपींनी ट्रॅक्टर व मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून अडवली. करारनाम्यानुसार रक्कम दिलेली असतानाही वाहन सोडवण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास वाहने जाळून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

धाराशिवमध्ये महिलांना स्वावलंबी करण्याचा संकल्प; रोजगारासाठी अर्थसहाय्य व शहर विकासाच्या घोषणा

मात्र, दुसरीकडे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे वेगळेच चित्र मांडणारे आहे. त्यांच्या मते, पवन ऊर्जा कंपन्यांकडून सुरुवातीला मोठ्या मोबदल्याचे आश्वासन देऊन करार केले जातात, परंतु प्रत्यक्षात अत्यल्प दर देऊन जमिनी ताब्यात घेतल्या जातात. करारातील अटींचे पालन न करता कामे सुरू ठेवली जातात. याला विरोध केल्यास शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करून दबाव आणला जातो.

“जमीन आमची, पण निर्णय कंपनीचा” अशी संतप्त भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खानापूर प्रकरणातही नेमका वाद काय, करारातील अटींची अंमलबजावणी झाली का, याबाबत स्पष्टता नसताना थेट गुन्हे दाखल झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या घटनेनंतर खानापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी संघटना व स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा, अशी मागणी केली आहे.

तज्ञांच्या मते, पवन ऊर्जा प्रकल्प हे पर्यावरणपूरक आणि विकासासाठी आवश्यक असले तरी, त्यासाठी शेतकऱ्यांचे हक्क डावलले जाऊ नयेत. करार प्रक्रिया पारदर्शक ठेवणे, योग्य मोबदला देणे आणि दोन्ही बाजूंमध्ये समन्वय राखणे गरजेचे आहे. दरम्यान, वाशी पोलीस ठाण्यात दाखल असून, प्रशासनाने या प्रकरणात संतुलित भूमिका घेत शेतकरी व कंपन्या यांच्यातील वाद मिटवून न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Dharashiv Health Department: धाराशिव आरोग्य विभागात गैरप्रकार? कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा आ. हेमंत ओगलेंनी केला आरोप

Web Title: Dharashiv wind power project khanapur farmers case land dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv News
  • farmer

संबंधित बातम्या

PMAY Dharashiv News : धाराशिवमध्ये ‘पंतप्रधान आवास योजने’ला गती! 89043 कुटुंबांचे स्वप्न होणार पूर्ण, जि. प. अध्यक्षांची माहिती
1

PMAY Dharashiv News : धाराशिवमध्ये ‘पंतप्रधान आवास योजने’ला गती! 89043 कुटुंबांचे स्वप्न होणार पूर्ण, जि. प. अध्यक्षांची माहिती

PM Kisan Yojana: 24 व्या हफ्त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम पूर्ण, अन्यथा सरकार 6000 रक्कम ठेवेल रोखून
2

PM Kisan Yojana: 24 व्या हफ्त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम पूर्ण, अन्यथा सरकार 6000 रक्कम ठेवेल रोखून

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
3

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
4

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.