Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गुढी पाडव्याचा गोडवा विरघळला; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, गुढी पाडवा सणाच्या उत्साहावरही पाणी फेरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2026 | 03:22 PM
राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत...

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत...

Follow Us
Follow Us:

धाराशिव : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, गुढी पाडवा सणाच्या उत्साहावरही पाणी फेरले आहे. नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच झालेल्या पावसामुळे, गुढी पाडव्याचा गोडवा अवकाळी पावसात विरघळला, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. बुधवारी, गुरुवारी सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगांनी भरून आले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यातील विविध भागांत कोसळला. धाराशिवसह परंडा, भूम, कळंब, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यांत पावसाचा जोर अधिक जाणवला.

 

या अनपेक्षित पावसामुळे काढणीस आलेली गहू, हरभरा, ज्वारी तसेच भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात भिजून गेली. परिणामी काढणीस आलेल्या पिकांवर याचा विपरीत परिणाम झाला असून पिकांची गुणवत्ता खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोमॅटो, वांगी, मिरची यांसारख्या भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले असून, फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा, डाळिंब यांसारख्या फळझाडांची फुले व लहान फळे गळून पडली आहेत.

याच दरम्यान गुढी पाडव्याच्या सणाची तयारी करणाऱ्या नागरिकांनाही या पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला. घराबाहेर गुढी उभारण्यासाठी सजावट, साफसफाई आणि खरेदी सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची धावपळ उडाली. बाजारपेठांमध्ये अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. फुलं, हार, सजावटीच्या वस्तूंची विक्री मंदावली, तर काही ठिकाणी पावसामुळे या वस्तूंचे नुकसानही झाले.

ग्रामीण भागात मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. एका बाजूला सणाचा आनंद साजरा करण्याची वेळ असताना दुसऱ्या बाजूला शेतीच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सण साजरा करण्याऐवजी नुकसानाचा आढावा घेण्यात गुंतलेले दिसून आले. वादळी वाऱ्यामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. काही गावांमध्ये पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला असून जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.

दरम्यान, कृषी व महसूल विभागाच्या पथकांनी नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले असून प्राथमिक अहवाल गोळा करण्यात येत आहे. अधिकृत नुकसानाची आकडेवारी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना पिकांची योग्य काळजी घेण्याचे आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अवकाळी पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. एकूणच, मराठी नववर्षाच्या स्वागताचा उत्साह असताना अवकाळी पावसाने सणावर विरजण घातले असून, धाराशिव जिल्ह्यात आनंद आणि चिंता यांचे मिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे आव्हान; शेती बटाईने देण्याचे कल

Web Title: Farmers have suffered losses due to unseasonal rains in dharashiv district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • maharashtra
  • Rain News

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड
1

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
3

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
4

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.