Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मॅरेथानमध्ये धावले धुळेकर

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 12, 2022 | 10:02 AM
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  मॅरेथानमध्ये धावले धुळेकर
Follow Us
Follow Us:

धुळे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. त्यातच अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शुक्रवारी धुळे येथे आयोजित केलेल्या मॅरेथान स्पर्धेला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

 

मॅरेथॉनला आमदार मंजुळाताई गावित आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी पोलिस बँडवर देशभक्तिपर गीते वाजविली जात होती, तर ठिकठिकाणी शालेय विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धकांचे स्वागत करत होते. तर यावेळी विविध सेवाभावी संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते स्पर्धकांना लिंबू पाणी देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मॅरेथॉनला सुरु झालेली ही मॅरेथॉन पाचकंदील, आग्रा रोड, फुलवाला चौक, मोठा पूल, नेहरू चौक, दत्तमंदिर पुन्हा नेहरू चौक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, वीर सावरकर यांचा पुतळा, जिल्हाधिकारी निवासस्थानमार्गे गरुड मैदानावर मॅरेथानचा समारोप झाला.

मॅरेथानच्या उदघाटन सोहळ्यास आमदार मंजुळाताई गावित आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, इत्यादींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार गावित यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे ही स्पर्धा आयोजित केली गेली असून नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम सुरू राहणार असून मॅरेथान नंतर शनिवारी १३ ऑगस्ट २०२२ रोजी सायकलिंग, चालणे आदी स्पर्धा होतील. या स्पर्धांनाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

Web Title: Dhulekar ran in a marathon on the occasion of amrit mahotsava year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 10:02 AM

Topics:  

  • Marathon
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live

संबंधित बातम्या

Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप
1

Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप

Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट
2

Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही
3

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ
4

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.