Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलीप वळसे पाटलांचं विखे पाटलांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

मी स्वतः पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना शाखा व घोड शाखेला पाणी सोडण्याबाबत विनंतीचे पत्र दिले असून, लवकरच या कालव्यांना पाणी सोडले जाईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 06, 2025 | 11:25 AM
दिलीप वळसे पाटलांचं विखे पाटलांना पत्र; केली 'ही' मोठी मागणी

दिलीप वळसे पाटलांचं विखे पाटलांना पत्र; केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Follow Us:

मंचर : सध्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून, डिंभे धरणातील पाणीसाठा केवळ १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मी स्वतः पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना शाखा व घोड शाखेला पाणी सोडण्याबाबत विनंतीचे पत्र दिले असून, लवकरच या कालव्यांना पाणी सोडले जाईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे शरद सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, युवा नेते राजेंद्र गावडे, माजी सभापती प्रकाश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, “कुकडी प्रकल्पातील आकडेवारीनुसार, एक आवर्तन शेती व पिण्यासाठी सोडता येईल. सोमवार, ५ मे रोजी अहिल्यानगर येथे पाटबंधारे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे आणि मी स्वतः त्या बैठकीस उपस्थित राहणार आहे.” ते पुढे म्हणाले, “या वर्षी पावसाबाबत अनिश्चितता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली असून, अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे.”

गावोगावी पाणी टंचाई होण्याची शक्यता

वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, “मी आंबेगाव तालुक्याच्या जनतेसोबत आहे आणि कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, हाच माझा प्रयत्न आहे.” तसेच, पाणीटंचाई गंभीर होत गेल्यास भविष्यात गावोगावी पाण्यावरून संघर्षाचे प्रसंग ओढवू शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

मला स्टंट करण्याची गरज नाही : वळसे पाटील

डिंभे डाव्या कालव्यातून घोड शाखेला गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडले जात नसल्यामुळे काही राजकीय नेत्यांनी कळंब येथे आंदोलन केले होते. या संदर्भात विचारले असता वळसे पाटील म्हणाले, “फोकसमध्ये राहण्यासाठी काहीतरी स्टंट करणं मला आवडत नाही.”

Web Title: Dilip walse patil has sent a letter to radhakrishna vikhe patil and made a big demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • BJP
  • Cmomaharasahtra
  • Dilip Walse
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
1

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.