रायगड : किल्ले रायगडच्या (Raigad Fort) पायथ्याशी असलेल्या बावले गावात डोंगराला भेगा (Divide The Mountain) गेल्याने तळीये गावची पुनरावृत्ती (Taliye Repitition) होण्याची भीती व्यक्त होत आहे. बावले (Bawle Village) गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर डोंगराचा अख्खा भाग कोसळ्याने जुलै २०२१ मध्ये पूर्ण गाव दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता महाड (Mahad) तालुक्यातल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या बावले गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
शेवंताबाई कडू यांच्या शेतात भेगा दिसताच गुराख्यांनी ग्रामस्थांना सतर्क केले आहे. जमीन भेगाळल्याने दरडीचा धोका निर्माण झाला आहे. डोंगरावर जनावरांना चारा चारण्यासाठी नेलेल्या गुराख्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर प्रशासनाला माहिती दिली. प्रशासन ग्रामस्थांच्या संपर्कात असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.