मुंबई : अधिक मास (Adhik Mass) संपत आला असून, काही दिवसांतच श्रावण महिना सुरु होईल. हिंदू परंपरेत श्रावण महिन्याला व्रत वैकल्याच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे. या काळात शंकाराची आराधना करण्याची परंपरा आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवास, तिर्थाटनं करण्यात येतात. श्रावण महिन्याच्या काळात तर तुमच्या स्वप्नात साप दिसत असेल तर ते स्वप्न सर्वसाधारण नाही, असं ज्योतिषांचं मत आहे. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात साप दिसण्याचे काय अर्थ आहेत हेही जाणून घेऊयात.
१. स्वप्नात पांढरा साप दिसणे
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पांढरा साप दिसत असेल तर तुमची कोणतीतरी इच्छा पूर्ण होणार असल्याचा तो संकेत मानला जातो. धनप्राप्तीचं लक्षण असल्याचं स्वप्नशास्त्र सांगतं. यातून व्यवसाय आणि नोकरीत बढतीची संधी मिळते.
२. पिवळा साप दिसणे
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पिवळा साप दिसला तर तुम्हाला राहण्यासाठी घरातून दुसरीकडे जावे लागेल, असा संकेत असतो. नोकरी किंवा व्यवसायात प्रवासाची शक्यता असते. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होई शकतात.
३. स्वप्नात साप पकडताना दिसणे
जर एखाद्या व्यक्तीने स्वताला स्वप्नात साप पकडताना पाहिले तर ते स्वप्न शुभ मानले जाते. तुम्हाला अचानक कुठूनतरी आर्थिक लाभ होणार असल्याचे ते संकेत मानण्यात येते. यासह तुमची कुठलीतरी इच्छा पूर्ण होणार असल्याचाही संकेत मानण्यात येतो.
४. स्वप्नात सापाचे दात दिसणे
स्वप्नात सोनेरी किंवा पंढरा साप दिसणे हे शुभ लक्षण मानण्यात येतं. याचा अर्थ तुमचं नशीब पालटणार आहे, असा त्याचा अर्थ काढण्यात येतो. श्रावण महिन्यात स्वप्नात सर्पाचा दात दिसणे हे अशुभ मानण्यात येतं. मात्र नागानं फणा काढलेला स्वप्नात दिसला तर तो शुभ मानण्यात येतो. याचा अर्थ तुमचं रेंगाळलेलं काम लवकरच पूर्ण होणार आहे.