• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Dahisar Toll Plaza To Be Shifted Mumbai News

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर टोल नाका लवकरच स्थलांतरित होणार असून, दिवाळीपूर्वी नागरिकांना वाहतूक कोंडीतून आणि टोलमधून मोठा दिलासा मिळेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 09, 2025 | 07:50 PM
दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! (Photo Credit- X)

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका!
  • परिवहन मंत्र्यांनी केली स्थलांतरणाची घोषणा
  • उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे होणारा अनावश्यक इंधनाचा अपव्यय आणि प्रदूषण थांबवण्यासाठी हा टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टोल नाका दिवाळीपूर्वी तेथून पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोर असलेल्या नर्सरी जवळ हलवण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, वसई-विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, IRB चे ठेकेदार विरेंद्र म्हैसकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🗓 ९ सप्टेंबर २०२५ | 📍मुंबई

दहिसर टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करण्यात येणार

मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच… pic.twitter.com/skEWsMLXKt

— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) September 9, 2025

15 लाख नागरिकांना मिळणार दिलासा

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “दहिसर टोल नाक्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील सुमारे १५ लाख स्थानिक नागरिक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे प्रवासाचा वेळ अर्धा ते एक तास वाढत होता आणि इंधनाचा विनाकारण अपव्यय होत होता.” यावर तोडगा काढण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतच असलेला हा टोल नाका शहराच्या बाहेर हलवण्याची आग्रही मागणी श्री. सरनाईक यांनी केली होती. या निर्णयामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता जमा; CM फडणवीसांच्या हस्ते वितरित

अशी असेल स्थलांतरणाची प्रक्रिया

या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल, असे श्री. सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे या दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Dahisar toll plaza to be shifted mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai
  • Mumbai News
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

‘ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती..’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
1

‘ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती..’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! सरकार वचनबद्ध; मंत्री अतुल सावे यांची मोठी ग्वाही
2

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! सरकार वचनबद्ध; मंत्री अतुल सावे यांची मोठी ग्वाही

बापरे! साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब! जसलोक रुग्णालयातील घटना
3

बापरे! साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब! जसलोक रुग्णालयातील घटना

Mumbai High Alert : मुंबई हाय अलर्ट जारी, नौदलाच्या जवानाची रायफल घेऊन संशयित फरार
4

Mumbai High Alert : मुंबई हाय अलर्ट जारी, नौदलाच्या जवानाची रायफल घेऊन संशयित फरार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल

AFG vs HK Asia Cup Live Score Update: उमरजईची वादळी खेळी! अफगाणिस्तानने हॉन्ग कॉन्गसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य

AFG vs HK Asia Cup Live Score Update: उमरजईची वादळी खेळी! अफगाणिस्तानने हॉन्ग कॉन्गसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.