Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali News : “दुकान आणि हॉटेल व्यावसायिकांनी मुस्लिमांना कामावर ठेवू नका”; भाजप पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेनंतर मुस्लीमांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन भाजपाकडून केलं जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2025 | 05:15 PM
Dombivali News : "दुकान आणि हॉटेल व्यावसायिकांनी मुस्लिमांना कामावर ठेवू नका"; भाजप पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

Dombivali News : "दुकान आणि हॉटेल व्यावसायिकांनी मुस्लिमांना कामावर ठेवू नका"; भाजप पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

Follow Us
Close
Follow Us:

डोबिंवली  : काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन निष्पापांचा मृत्यू झाला. आधी धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. ज्या प्रकारे लोकांना गोळया घालून मारले गेले. ते पाहून आणि ऐकूणच देशात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. दशहतवाद्यांना आणि पाकिस्तानला लवकरात लवकर धडा शिकविला पाहिजे ही भावना प्रत्येक भारतीयांची आहे. भाजप कार्यकर्त्याकडून या घटनेनंतर मुस्लीमांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. दुकानं आणि हॉटेलमध्ये जाऊन मुस्लिम कामगारांना ठेवू नका असे आवाहन भाजपाने व्यावसायिकांना केले आहे. यामुळे एकूणच व्यावसायिक हैराण झाले.

डोंबिवलीतील एका व्यावसायिकावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बळजबरी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमच्याकडे काम करीत असलेल्या सातही मुस्लीमांना लवकरात लवकर कामावरुन काढून टाका असा दम भाजप पदाधिकाऱ्याने डोंंबिवलीतील द्वारका हॉटेल व्यवस्थापनास दिला आहे. यावर काँग्रेस आणि मनसेने सकडून टिका केली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला हा प्रकार समोर आल्यावर काँग्रेस प्रदेश पदाधिकारी नवीन सिंह यांनी भाजपच्या या आवाहनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. सिंह यांनी सांगितले,भाजपचे कार्यकर्ते उद्रेक करीत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत आहेत ते चुकीचे आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे थांबविले पाहिजे अशी मागणी केली आहे. तर मनसे नेते राजू पाटील यांनी देखील ट्वीट केले आहे की, जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत.

लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ? जेव्हा हे घडल तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदी नी केली म्हणून सर्वांना सांगितला मग हा हल्ला कोणाच्या चुकीमुळे झाला ? ह्याचं उत्तर कोण देणार ? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारला कधीतरी द्यावीच लागतील. ते नराधम निष्पाप जीवांचे बळी घेताना धार्मिक शेरेबाजी करत आहेत व आपल्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत त्याअर्थी त्यांना हे पक्के माहित आहे की जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात.

Web Title: Dombivali news shopkeepers and hoteliers should not employ muslims bjp office bearers take aggressive stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • BJP
  • dombivali news
  • pahalgam attack
  • thane

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत
2

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
3

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार
4

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.