Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरणामुळे धान्य पिकावर रोगांचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांना आर्थिक फटका; उन्हाळी धान्यावर होणार परिणाम

रब्बी हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांना गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली असून, काही भागात पिके काढणीस आली. गत ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी पिकांसह भाजीपाला पिकावर विविध रोगराईचा प्रादुर्भाव सुरू झाला.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2026 | 02:05 PM
वातावरणामुळे धान्य पिकावर रोगांचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांना आर्थिक फटका; उन्हाळी धान्यावर होणार परिणाम

वातावरणामुळे धान्य पिकावर रोगांचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांना आर्थिक फटका; उन्हाळी धान्यावर होणार परिणाम

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे उन्हाळी धान मोठा दुष्परिणाम दिसून येत आहेत. तळोधी बा, वाढोणा, सावरगाव, येनोली, गोविंदपूर, कान्हाळगाव परिसरात धानपिकाला खोड किडा, बुरसी अस्या विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका वसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागभीड तालुक्यात उन्हाळी धानपीकाची रोवणी होऊन १५ दिवस लागवडीला झाले आहे. ढगाळ वातावरण निर्माण होत असून तापमाणात सतत चढ-उतार होत आहे. यामुळे उन्हाळी धान पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात दरवर्षी पेक्षा यंदा खाजगी बोरवेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी गाव तलाव आणि घोडझरीच्या कालव्यामुळे उन्हाळी धान पिकाची लागवड केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी मक्याची कडधान्य लागवड केली.(फोटो सौजन्य – istock)

सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’

परंतु, यावर्षी रोगाचा एवढा प्रादुर्भाव वाढला असून, कीटकनाशकाची फवारणी करूनही रोग नाहीसे होत नाही आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामात धान पीक दोन पटीने जास्त निघतात. याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीत पुरेशा प्रमाणात पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे धानपिकाला पोषक वातावरण मिळते व धानाला मोठ्या प्रमाणात फुटवे निघतात. त्यामुळे उन्हाळी धान पीक पावसाळी धानपिकापेक्षा जास्त असते. वातावरणाच्या बदलामुळे धानपिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. एवढेच नव्हे तर ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्यसारखे रोग उद्भवतात. यामुळे यावर्षी उन्हाळी धानपिकावर परिणाम होऊन उत्पन्नात घट होण्याची स्थिती निर्माण झाली. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात

रब्बी हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांना गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली असून, काही भागात पिके काढणीस आली. गत ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी पिकांसह भाजीपाला पिकावर विविध रोगराईचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी किटकनाशक औषधीसह अन्य फवारणी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. रब्बी हंगामात हरभरा, गहू, वटाणा या पिकासह टमाटर, वांगी व अन्य भाजीपालावर्गीय पिकाचे उत्पादन शेतकरी घेतो. परंतु, यावर्षी अगोदरच भाजीपाल्याचे भाव कोसळले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारपेठेत आवक वाढली. मात्र, भाव कोसळल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यावर बसत आहे.

११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

आठवड्याभरापासून तूर व सोयाबीनचे भाव कोसळले. मध्यंतरी कापसाला चांगला भाव मिळाला व आता पुन्हा साडेसहा ते ७ हजार रुपयांवर आलेला आहे. कापसाचे भाव एका क्विंटलमागे १ हजार रुपयांनी घसरले. शेतमालाचे भाव सातत्याने घसरत असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यावर बसत असल्याचे शेतकऱ्याकडून सांगितले जात आहे. सध्या आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्याने कोबी, फूलकोबी, वांगी, टमाटर याचे भाव निम्म्यावर आले असून, १० रुपये प्रति किलो शेतकरी विकत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे, शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली. मात्र, ग्राहकांकडून विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने भाजीपाल्याला उठाव नसल्याचे सांगितले जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Due to the environment the outbreak of diseases on the grain crop financial hit to farmers effect on summer crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • farmer
  • Yavatmal
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

Yavatmal Crime: महामंडळावर पद देण्याचे आमिष; 20.25 कोटींची डील ठरवणारी ठगबाज टोळी जेरबंद
1

Yavatmal Crime: महामंडळावर पद देण्याचे आमिष; 20.25 कोटींची डील ठरवणारी ठगबाज टोळी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.