Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद

अवैध कृषी निविष्ठांच्या पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असून अशा व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्यापक आणि धडक मोहिमेमुळे अमरावती विभागाने बनावट कृषी निविष्ठांविरोधातील कारवाईत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 18, 2026 | 03:30 PM
Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद

Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद

Follow Us
Follow Us:

खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने अमरावती विभागात राबविलेल्या विशेष गुणनियंत्रण मोहिमेत राज्यातील सर्वाधिक मोठी आणि प्रभावी कारवाई केली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५२० कृषी केंद्रांवर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले, तर २३० कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय २३ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून १ कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचे बनावट व निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.(फोटो सौजन्य – AI)

दुष्काळी यवतमाळात आढळला समृद्ध वारसा! दिग्रसनजीक उत्खननातून मिळाली ३ हजार वर्षापूवींची मानवी वस्ती

खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात आणि बनावट मालाच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक थांबावी, यासाठी कृषी विभागाने संपूर्ण विभागात व्यापक धाडसत्र राबविले. कृषी केंद्रांमधून बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासण्यात आली. तपासणीत निकृष्ट किंवा नियमबाह्य माल आढळताच संबंधित विक्रेत्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्यात आली.

यंदाच्या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच रेल्वे आणि खाजगी प्रवासी बसमधून पाठविल्या जाणाऱ्या कृषी निविष्ठांच्या खेपांवरही करडी नजर ठेवण्यात आली. या माध्यमातून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या संशयित बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.उद्दिष्ट्‌यापेक्षा अधिक कृषी केंद्रांची तपासणी विभागात एकूण २२ हजार ३२३ कृषी केंद्रांपैकी ४ हजार ८९८ केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, कृषी विभागाने ५ हजार ६१ केंद्रांची तपासणी करून लक्ष्यापेक्षा अधिक कारवाई केली.

Uddhav Thackeray Yavatmal: माझ्या सांगण्यावरून तुम्ही ‘त्या’ बुजगावण्याला निवडून दिलं’; उद्धव ठाकरेंनी मागितली मतदारांची माफी

कारवाईत राज्यात मिळविले अव्वल स्थान

अवैध कृषी निविष्ठांच्या पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असून अशा व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्यापक आणि धडक मोहिमेमुळे अमरावती विभागाने बनावट कृषी निविष्ठांविरोधातील कारवाईत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची कठोर आणि सातत्यपूर्ण मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati news crackdown on spurious agricultural inputs 230 licenses cancelled sales halted at 520 agro centers in amravati division

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • agricultural
  • amravati
  • farmer

संबंधित बातम्या

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?
1

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती
2

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

Yavatmal News: दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार
3

Yavatmal News: दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.