फोटो - सोशल मीडिया
अंतरवली : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे जोरदार तयारी सुरु आहे. महायुती सह महाविकास आघाडीचे नेते सभा आणि बैठका घेत आहे. चर्चा आणि जागावाटप यांची सर्वत्र चर्चा आहे. मात्र यंदाच्या निवडणूकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न निवडणूकांवर परिमाण करणार आहे. त्यामुळे समोर आणि पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भल्या पहाटे भेट झाली आहे. पहाटे 3 वाजता या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे.
राज्याचे कृषी मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे भल्या पहाटे परळीमध्ये दाखल झाले. पहाटेच्या अंधारामध्ये धनंजय मुंडेंनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. सरपंचाच्या घरी दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दरम्यान आज परळी येथे मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार असून, त्या अगोदर दोघांमधील भेट महायुतीच्या दृष्टीने आणि मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंसोबत भेट झाल्याचे सांगतिले. मात्र धनंजय मुंडे यांनी ही भेट झाल्याचे नाकारले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मी झोपेत होतो. पहाटेच्या तीन वाजता ते आले असतील. आमच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. अंतरवलीत कोणीही येऊ शकतो. आमच्याकडे आयतं मैदान आहे. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चांगलं काम करायला लागली, तर कौतुक का करू नये? आमची आरक्षणावर चर्चा झाली. मला आरक्षणाशिवाय दुसरी वेळ नाही. समोरील व्यक्तीचं वेगळं असतं आणि माझं वेगळंच असतं. आम्हाला तयारी करायची गरज नाही, त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी तयार आहोत. आम्ही महायुती किंवा महाविकास आघाडीचे नाही तर मराठा समाजाचे आहोत, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.