गणेश नाईकांच्या 'त्या' विधानावर उदय सामंत यांचा थेट पलटवार (Photo Credit - X)
पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, “गणेश नाईक सध्या भाजपच्या लाटेवर स्वार होऊन बोलत आहेत, परंतु त्यांनी बोलण्यापूर्वी स्वतःचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलग पाच वेळा न पडता निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेण्यापूर्वी नाईक यांनी आपले वय आणि अनुभवाचे भान ठेवावे.”
कोकणकरांसाठी खुशखबर! दावोसमध्ये तब्बल ३ लाख कोटींचे करार; उदय सामंत यांची माहिती
सामंत यांनी नाईक यांना त्यांच्या मंत्रीपदाची आठवण करून देताना म्हटले, “महापौर कुठे झाला असता कुठे झाला नसता आणि नंतरचा प्रश्न, पण जर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले नसते, तर गणेश नाईक यांना मंत्रीपद देखील मिळाले नसते. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी ते उपमुख्यमंत्र्यांवर उठसूट टीका करत आहेत. शिवसैनिक त्यांच्या वयाचा मान राखून सध्या शांत आहेत, मात्र यापुढे अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत. नेता म्हणून कोणाला आव्हान द्यायचे असेल तर सलग निवडून येण्याची ताकद लागते. हा माझा त्यांना सल्ला नाही, तर स्पष्ट सूचना आहे.”
ठाणे, कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची शिवसेनेबरोबर युती झाल्यामुळे परवड झाली, अशी खंत भाजपचे नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केली. युती झाल्यामुळें वनमंत्री गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. ‘भाजपला जर खुली दिली असती तर भाजपाचा सर्व ठिकाणी महापौर सगळीकडे बसला असता.’ अशी भावना व्यक्त करून ठाण्यात येऊन गणेश नाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले आहे. ‘भाजपाने परवानगी दिली तर यांचा नामोनिशान संपवेन.’, असे आवाहन देखील गणेश नाईक यांनी शिंदेंना दिले.
Ratnagiri ZP Election: रत्नागिरीचे जागा वाटप सुटणार? सामंत जिल्ह्यात ठाण मांडून, शिवसेना 45…






