Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीठागरांच्या मालकी हक्कासाठी उत्पादकांचा एल्गार! न्यायालयीन लढा सुरू; सरकारने हस्तक्षेप करून तातडीने न्याय देण्याची मागणी

मीरा-भाईंदर परिसरात अनेक पिढ्यांपासून मीठ उत्पादनाचा व्यवसाय करणारे उत्पादक आपल्या जमिनींवरील मालकी हक्कासाठी गेली अनेक वर्षे न्यायालयीन लढा देत आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2026 | 08:45 AM
मीठागरांच्या मालकी हक्कासाठी उत्पादकांचा एल्गार! न्यायालयीन लढा सुरू; सरकारने हस्तक्षेप करून तातडीने न्याय देण्याची मागणी

मीठागरांच्या मालकी हक्कासाठी उत्पादकांचा एल्गार! न्यायालयीन लढा सुरू; सरकारने हस्तक्षेप करून तातडीने न्याय देण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

मीरा-भाईंदर परिसरातील शेकडो एकर मिठागरांच्या जमिनींच्या मालकी हक्काच्या प्रश्नावरून मीठ उत्पादक आणि केंद्र सरकारच्या मीठ विभागामधील वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात शहरातील सुमारे २२० एकर मिठागराची जमीन मीठ विभागाच्या मालकीची नसल्याचे स्पष्ट केल्याने स्थानिक मीठ उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर मिठागरांच्या मालकी हक्काच्या लढ्याला नवी दिशा मिळाली असून सरकारने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी मीठ उत्पादकांनी केली आहे.(फोटो सौजन्य – istock)

‘देशाच्या सर्वांगीण विकासासाठी…’; हिंदी पत्रकारितेच्या 200 व्या वर्षपूर्ती सोहळ्यात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मीरा-भाईंदर परिसरात अनेक पिढ्यांपासून मीठ उत्पादनाचा व्यवसाय करणारे उत्पादक आपल्या जमिनींवरील मालकी हक्कासाठी गेली अनेक वर्षे न्यायालयीन लढा देत आहेत. मीठ विभागाकडून या जमिनींवर मालकीचा दावा करण्यात येत असला तरी त्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे विविध न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान समोर आले असल्याचा दावा मीठ उत्पादकांकडून करण्यात येत आहे.मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालात मिरा-भाईंदरमधील सुमारे २२० एकर मिठागराची जमीन खासगी मालकीची असल्याचे नमूद करत मीठ विभागाचा दावा फेटाळून लावला. या निर्णयामुळे मालकी हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या इतर मीठ उत्पादकांच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

अनेक दशकांपासून त्यांच्या कुटुंबांकडे असलेल्या आणि पिढ्यानपिढ्या वापरात असलेल्या जमिनींवर मीठ विभाग मालकी हक्क सांगत असून त्यामुळे उत्पादकांना विनाकारण न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे, असे मीठ उत्पादकांचे म्हणणे आहे.सरकारने या मागण्यांची दखल घेतली नाही तर मीठ विभागाकडून होत असलेल्या कथित आर्थिक अपव्ययाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा मीठ उत्पादक छोटे शिलोत्री सेवा संघाने दिला आहे.संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयानंतरही सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही तर जनतेचा पैसा वाया घालवणा-या संबंधित यंत्रणाविरोधात न्यायालयीन लढा उभारला जाईल.

पावसाळ्यात लोकल ट्रेनचा प्रवास राहणार सुसाट! रेल्वे मार्गावरील धोकादायक झाडांवर पालिकेची कुऱ्हाड, ६७ फांद्यांची केली छाटणी

मीठ उत्पादक छोटे शिलोत्री सेवा संघाने केंद्र सरकारच्या मीठ विभागावर गंभीर आरोप केले आहेत. जमिनींवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे नसतानाही विभागाकडून न्यायालयीन दावे दाखल करून जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेच्या मते, सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो तोडगा काढणे आवश्यक आहे. अन्यथा वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वादामुळे उत्पादकांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत राहणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Elgar of producers for ownership rights of sweets a court battle ensued demand for government intervention and immediate justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • mira bhaindar
  • Mumbai News
  • Phil Salt

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश
1

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर
2

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
3

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
4

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.