Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut PC: ‘मोदींचा विकास कुणी समजावून सांगितला, तर मीही भाजपमध्ये जाईन’; संजय राऊतांचे खुले आव्हान

Sanjay Raut PC- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दाव्यांवर टीका करताना राऊत यांनी आव्हानात्मक भूमिका घेतली. "कोणी मला मोदींचा विकासाचा मुद्दा समजावून सांगितला, तर मीही भाजपमध्ये जाईन. मोदींनी नेमके काय केले, हे सांगा

  • By anuradha sagar
Updated On: Jun 01, 2026 | 01:47 PM
Sanjay Raut, ShivSena UBT, Narendra Modi, Prajakt Tanpure,

Sanjay Raut, ShivSena UBT, Narendra Modi, Prajakt Tanpure,

Follow Us
Follow Us:
  • विकासकामे करायची आहेत म्हणून पक्षांतर केले जाते, हा केवळ दिखावा आहे
  • भाजपचे स्वतःचे असे काही उरलेले नाही
  • सरकारने महिलांच्या भावनांशी खेळ करू नये
Sanjay Raut PC: “विकासकामांसाठी भाजपमध्ये जात असल्याचे कारण आता जनतेला पटणारे राहिलेले नाही. विकासकामे करायची आहेत म्हणून पक्षांतर केले जाते, हा केवळ दिखावा आहे. भाजपने किमान आपल्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांप्रती तरी निष्ठा दाखवली पाहिजे.” अशा शब्दांत प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची घोषणा होत असताना शिवसेना संजय राऊत यांनी भाजप, महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या उमेदवारीच्या धोरणावर, पक्षांतराच्या राजकारणावर तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावरही टीका केली.

Thane water cut: मान्सूनपूर्वी ठाणेकरांची चिंता वाढली! ३ जूनला शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा बंद

दरम्यान भाजपकडून विधानपरिदेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे अरूण लखानी यांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रीया देताना म्हटले की,”लखानी हे जन्मापासून संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे वेगळे नसून एकाच विचारसरणीचे भाग आहेत. आम्हीदेखील आमच्या संघटनांमधील कार्यकर्त्यांना संधी देतो.”

भाजपच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले, “भाजपचे स्वतःचे असे काही उरलेले नाही. अनेक राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री आणि नेते हे काँग्रेसमधून गेलेले आहेत. भाजपकडे स्वतंत्र नेतृत्व आणि विचार किती आहेत, हा खरा प्रश्न आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दाव्यांवर टीका करताना राऊत यांनी आव्हानात्मक भूमिका घेतली. “कोणी मला मोदींचा विकासाचा मुद्दा समजावून सांगितला, तर मीही भाजपमध्ये जाईन. मोदींनी नेमके काय केले, हे सांगा. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी सरकारच्या कामगिरीबाबत मी ठोसपणे सांगू शकतो,” असे ते म्हणाले.

PM Narendra Modi: भाजप संघटना आणि मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल होणार; अमित शाह, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत ‘हायप्रोफाईल’ बैठक

यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर बोलताना राऊत म्हणाले, “आधी देवेंद्र फडणवीस आम्हाला तुरुंगात टाकत होते, आता मोदी सरकार तीच भूमिका पार पाडत आहे.” दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याच्या चर्चेवरही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. “निवडणुकीत मतदान मिळवण्यासाठी महिलांना पैसे देण्यात आले. आता त्यांच्याकडून पैसे परत मागितले जाणार असतील, तर त्या महिला ते पैसे कुठून आणणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही लाडके भाऊ आहेत. पण सरकारने महिलांच्या भावनांशी खेळ करू नये,” असेही ते म्हणाले. मोदींवरील टीका अधिक तीव्र करताना राऊत म्हणाले, “मोदींचा एखादा विचार मला पटला, तर मी त्यांचे भजनही करेन. पण सध्या जनतेसमोर जे चित्र आहे, त्यात सरकारची आश्वासने आणि वास्तव यात मोठी तफावत दिसून येते.”

 

Web Title: Explain modis development to me and i will join bjp sanjay rauts open challenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • narendra modi
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

‘अजितदादांनंतर जयंत पाटीलच अर्थखातं सांभाळू शकतात, पण..,’ सुषमा अंधारेंचं मोठं विधान; तटकरे, प्रफुल्ल पटेलांवर सडकून टीका
1

‘अजितदादांनंतर जयंत पाटीलच अर्थखातं सांभाळू शकतात, पण..,’ सुषमा अंधारेंचं मोठं विधान; तटकरे, प्रफुल्ल पटेलांवर सडकून टीका

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
2

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’
3

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘रामदास आठवलेंना भेटले तर…’
4

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘रामदास आठवलेंना भेटले तर…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.